पगार नव्हे, 'कुबेराचा खजिना'! सत्या नडेला यांना एका वर्षात तब्बल 8,47,00,00,000 रुपये पगार; आकडा पाहून डोळे विस्फारतील

Last Updated:

सत्या नडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्टने AI क्षेत्रात प्रगती केली, OpenAI गुंतवणुकीमुळे त्यांचा पगार २२ टक्क्यांनी वाढून ९६.५ दशलक्ष डॉलर झाला.

News18
News18
कंपनीच्या CEO ला किती पगार असावा असा एक साधारण अंदाज आहे, तुम्ही विचार करणार नाही त्या पलिकडे AI ने कमाल केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना AI मुळे मोठा नफा झाला आहे. त्यांचा पगार तब्बल 22 टक्क्यांनी वाढला आहे. आज जगभरातील CEO मध्ये सर्वात जास्त पगार घेणाऱ्यांच्या यादीमध्ये त्यांचा पहिला क्रमांक आहे. सत्या नडेल यांच्या कमाईने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. २०२४-२५ मध्ये त्यांना तब्बल ९६.५ दशलक्ष डॉलर साधारण ८४७ कोटी रुपये एवढी घसघशीत सॅलरी मिळाली आहे. ही त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत २२ टक्क्यांनी अधिक आहे.
AI क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट बनले 'वर्ल्ड लीडर'
वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये नडेला यांना ७९.१ दशलक्ष डॉलर साधारणपणे सुमारे ६९४ कोटी रुपये पगार मिळाला होता. कंपनीच्या बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, ही भरघोस वाढ थेट मायक्रोसॉफ्टने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) क्षेत्रात केलेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे झाली आहे. बोर्डाने नडेला आणि त्यांच्या टीमला श्रेय दिले आहे की, त्यांनी मायक्रोसॉफ्टला AI सेक्टरमध्ये जगातील सर्वात मोठी लीडर कंपनी बनली आहे. नडेला यांच्या या पगाराच्या पॅकेजमध्ये २.५ दशलक्ष डॉलर सुमारे २२ कोटी रुपये Basic Salary म्हणून दिली आहे, तर उर्वरित रक्कम म्हणजे जवळपास ९०% मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सच्या (Stocks) स्वरूपात आहे.
advertisement
केवळ नडेलाच नव्हे, टॉप टीमचीही भरभराट
सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखालील टीमनेही जबरदस्त कमाई केली आहे. चीफ फायनान्शिअल ऑफिसर एमी हूड यांना २९.५ दशलक्ष डॉलर २५९ कोटी रुपये आणि कमर्शियल बिझनेस हेड जडसन अल्थॉफ यांना २८.२ दशलक्ष डॉलर म्हणजेच २४७ कोटी रुपयांचे पॅकेज मिळालं. नडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्टने क्लाउड कॉम्प्युटिंग आणि AI मध्ये मोठी प्रगती केली. कंपनीचा Azure क्लाउड बिझनेस ॲमेझॉनसारख्या मोठ्या प्रतिस्पर्धकांना कडवी टक्कर देत आहे. याच वर्षात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
advertisement
ओपनएआय मध्ये गुंतवणूक ठरली 'मास्टरस्ट्रोक'
सत्या नडेला यांचा सर्वात मोठा आणि यशस्वी निर्णय म्हणजे OpenAI मध्ये केलेली गुंतवणूक. २०१९ मध्ये मायक्रोसॉफ्टने या छोट्या AI स्टार्टअपमध्ये १ अब्ज डॉलर (सुमारे ८,७७५ कोटी रुपये) गुंतवले. त्यानंतर ChatGPT च्या प्रचंड यशाने OpenAI ला AI जगातील 'सुपरस्टार' बनवले. मायक्रोसॉफ्टने यात पुन्हा १० अब्ज डॉलरचा अतिरिक्त निधी दिला आणि आता कंपनीच्या जवळपास प्रत्येक प्रॉडक्टमध्ये AI फीचर्स जोडले गेले आहेत.
advertisement
याशिवाय, नडेला यांनी मायक्रोसॉफ्टला केवळ सॉफ्टवेअर कंपनीपुरते मर्यादित न ठेवता गिटहब आणि लिंक्डइन सारख्या मोठ्या कंपन्या विकत घेतल्या, तसेच गेमिंग सेक्टरमध्ये ग्रोथसाठी एक्टिव्हिजन ब्लिझार्ड ला खरेदी केले.
हैदराबाद ते मायक्रोसॉफ्ट सीईओ पदापर्यंतचा प्रवास
हैदराबादमध्ये जन्मलेल्या सत्या नडेला यांनी १९८८ मध्ये मंगळूर विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी १९९० मध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स पूर्ण केले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'सन मायक्रोसिस्टम्स' (Sun Microsystems) येथून केली. १९९२ मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट जॉइन केले. येथे विंडोज एनटी सारख्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम करत त्यांनी क्लाउड बिझनेसचे नेतृत्व स्वीकारले. ४ फेब्रुवारी २०१४ रोजी ते बिल गेट्स आणि स्टीव्ह बाल्मरनंतर मायक्रोसॉफ्टचे तिसरे CEO बनले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
पगार नव्हे, 'कुबेराचा खजिना'! सत्या नडेला यांना एका वर्षात तब्बल 8,47,00,00,000 रुपये पगार; आकडा पाहून डोळे विस्फारतील
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement