advertisement

जे मागच्या 5 वर्षांत झालं नाही ते काही तासांत घडलं, क्रूड ऑइलने एका स्टॉकचं नशीब बदललं

Last Updated:

शेअर बाजारात आज 2500 अंकांनी कोसळले. आकाश एक्सप्लोरेशन सर्व्हिसेसच्या शेअरने २० टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे शेअरने गुंतवणूकदारांना ४५ टक्क्यांचा परतावा दिला.

News18
News18
शेअर बाजारात आज हाहाकार माजला, मार्केट 2500 अंकांनी कोसळलं. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी पडझड सुरू असताना दिग्गज कंपन्यांचे शेअर्स ५ ते १० टक्क्यांनी कोसळले आहेत. मात्र, अशा भीषण मंदीतही एका ११ रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं. आकाश एक्सप्लोरेशन सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरमध्ये आज थेट २० टक्क्यांचं अप्पर सर्किट' लागला असून, या शेअरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
५ वर्षांचा वनवास संपला?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या ५ वर्षांपासून या शेअरने गुंतवणूकदारांना फक्त नेगेटिव्ह' रिटर्न्स दिले होते. ५ वर्षांत जी प्रगती झाली नाही, ती कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे अवघ्या काही तासांत घडली आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत आणि याच तेलाच्या उसळीने या स्टॉकचं नशीब उजळलं आहे.
advertisement
का वाढतोय हा शेअर?
आकाश एक्सप्लोरेशन ही प्रामुख्याने तेल आणि गॅस उत्खनन क्षेत्रातील कंपनी आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की अशा सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होतो. विशेष म्हणजे, या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत ओएनजीसी, आयओसी, रिलायन्स आणि वेदांता सारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. आज सकाळी हा शेअर १०.२० रुपयांवर उघडला आणि बघता बघता ११.७४ रुपयांच्या हाय लेव्हलवर पोहोचला.
advertisement
महिन्याभरात ४५ टक्क्यांची झेप!
या शेअरमध्ये तेजीचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. ४ आणि ५ मार्चलाही या शेअरने २० टक्क्यांची भरारी घेतली होती. ६ मार्चला थोडी नफावसुली झाली असली, तरी आज पुन्हा एकदा या शेअरने 'रॉकेट' गती पकडली आहे. अवघ्या एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना ४५ टक्क्यांचा परतावा दिला आहे.
advertisement
हा एक पेनी स्टॉक असून याचे मार्केट कॅप ११६ कोटी रुपये आहे. कच्च्या तेलाच्या जागतिक परिस्थितीवर या शेअरची चाल अवलंबून आहे. त्यामुळे अशा छोट्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना जोखीम ओळखूनच पाऊल उचलणे गरजेचे आहे.
डिस्क्लेमर- इथे दिलेली बातमी ही केवळ माहितीच्या उद्देशानं दिली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावी, कोणत्याही नफ्या तोट्याची जबाबदारी न्यूज18 घेत नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/
जे मागच्या 5 वर्षांत झालं नाही ते काही तासांत घडलं, क्रूड ऑइलने एका स्टॉकचं नशीब बदललं
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement