advertisement

Shocking Incident : स्वप्न होतं आरामाचं,पण नशिबात होतं काही दुसरंच; सेवानिवृत्तीनंतर काही वर्षांतच नियतीने घातला 'असा' डाव

Last Updated:

Shocking News Dombivli : आयुष्यभर कष्ट करून सेवानिवृत्तीनंतर शांत आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या महिलेवर नियतीने अनपेक्षित घाव घातला. पेन्शन काढण्यासाठी घराबाहेर पडताच असं काही झालं की अख्ख शहर अवाक् झालं आहे.

डोंबिवली एटीएम फसवणूक प्रकरण
डोंबिवली एटीएम फसवणूक प्रकरण
डोंबिवली : डोंबिवलीमध्ये एका निवृत्त महिला अधिकाऱ्याची एटीएमधून फसवणूक झाल्याची घटना समोर आलेली आहे. थोडा दाखवलेला निष्काळजीपणाचा फायदा घेत भामट्याने त्यांच्या खात्यातून पैसे काढत त्यांना दुसऱ्या बँकेचे कार्ड देऊन पसार झालेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा रोड परिसरात राहत असलेल्या छाया देशपांडे या मुंबई महानगरपालिकेतील निवृ्त्त अधिकारी आहेत. त्या नेहमीप्रमाणे आपली पेन्शन काढण्यासाठी घराजवळ असलेल्या एटीएमध्ये गेल्या होत्या. तेव्हाच इंदिरा चौकाजवळील एटीएममध्ये त्या पैसे काढत असताना संपूर्ण प्रकार घडला.
नेमकं काय घडल?
छाया या एटीएममध्ये असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती तिथं गेला आणि त्यांना मदतीचा बहाणा केला.पण मशीन नीट चालत नाही किंवा हे कार्ड योग्यरित्या वापरले जात नाही, असे त्यांना सांगत त्यांचा विश्वास मिळवला.नंतर त्याने छाया यांचे कार्ड हातात घेऊन काहीतरी प्रक्रिया केल्याचा बहाणा केला.
advertisement
या दरम्यान त्याने हुशारीने त्यांचे जे मूळ एटीएम कार्ड होते ते बदलले आणि दुसऱ्या बँकेचे एटीएम कार्ड त्यांच्या हातात दिले. पण सुरुवातील छाया यांच्या ते लक्षात आले नाही. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून 5 हजार रुपये काढण्यात आल्याचे त्यांना समजले.
छाया यांनी नंतर बँकेत जाऊन तपास केला तेव्हा संपूर्ण घडलेला फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला. तातडीने त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु करण्यात आलाय.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : स्वप्न होतं आरामाचं,पण नशिबात होतं काही दुसरंच; सेवानिवृत्तीनंतर काही वर्षांतच नियतीने घातला 'असा' डाव
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement