advertisement

Metro 9 सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात, 'पांडुरंग वाडी' स्थानकाच्या नावावरून स्थानिक संतापले

Last Updated:

दहिसर- मीरा भाईंदर मार्गावरील मेट्रो सुरू होण्यापूर्वीच चर्चेत आली आहे. 'पांडुरंग वाडी' मेट्रो स्थानकाच्या नावावरून स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

News18
News18
मुंबई: दहिसर- मीरा भाईंदर मार्गावरील मेट्रो म्हणजेच मेट्रो लाईन 9 सुरू होण्यापूर्वीच चर्चेत आली आहे. मेट्रो लाईन 9 च्या पहिल्या टप्प्यातील 'पांडुरंग वाडी' मेट्रो स्थानकाच्या नावावरून काही वाद निर्माण झाला आहे. तिथल्या स्थानिक नागरिकांनी जोरदार आंदोलन करत 'पांडुरंग वाडी' मेट्रो स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. मेट्रो लाईन 9 मधील 'पांडुरंग वाडी' मेट्रो स्थानकाचे नाव बदलून 'पेणकर पाडा' असं नाव ठेवण्याची मागणी केली जात आहे. मेट्रो स्थानकाच्या नावासाठीच तिथल्या स्थानिकांनी आंदोलन पुकारले आहे.
येत्या 6 एप्रिलला दहिसर पूर्व ते काशिगाव या मेट्रो स्थानकादरम्यान पहिल्या टप्प्याच्या मेट्रो मार्गिकेचं उद्धाटन केलं जाणार आहे. या मेट्रो सेवेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. 'मुंबई न्यूज' नावाच्या सोशल मिडिया पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तिथले स्थानिक रहिवासी मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावर 'पेणकर पाडा' नावाचा कागदी फलक लावताना दिसत आहेत. इतकेच नाही, तर मेट्रो लाईन सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने नाव दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला असल्याचेही त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Metro 9 सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात, 'पांडुरंग वाडी' स्थानकाच्या नावावरून स्थानिक संतापले
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement