BMC Election : ठाकरे बंधूंच्या लढाईत शरद पवार सोबतीला,पण इतक्याच जागा मिळणार!
- Reported by:PRANALI KAPASE
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधुंची युती झाली आहे. पण अद्याप दोन्ही पक्षांनी जागावाटप जाहीर केलं नाही आहे. अशात आता या निवडणुकीचा अर्ज भरायला अवघे दोन दिवस शिल्लक असताना शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत घेतलं आहे.
BMC Election 2026 News : मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधुंची युती झाली आहे. पण अद्याप दोन्ही पक्षांनी जागावाटप जाहीर केलं नाही आहे. अशात आता या निवडणुकीचा अर्ज भरायला अवघे दोन दिवस शिल्लक असताना शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत घेतलं आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नुसती युती झाली नाही आहे,तर जागावाटप देखील ठरलं आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा देऊ केल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
खंर तर चार दिवसांपूर्वी म्हणजेच 24 डिसेंबर 2025 ला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती झाी होती. या युतीमधून लढण्याची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील इच्छा होती.त्यामुळे राष्ट्रवादीची दोन्ही ठाकरे बंधुंच्या नेत्याशी चर्चा सूरू होती.
युतीच्या या चर्चे दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ठाकरे बधुंसमोर 52 जागांच्या मागणीचा प्रस्ताव ठेवला होता.या प्रस्तावाला दोन्ही पक्षाचा नकार होता. अखेर तडजोड करत ठाकरे बंधु 10 जागा देण्यावर राजी झाले आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची ठाकरे बंधू सोबत युती झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा मनसे यूतीकडून 10 जागा देण्यात आल्या आहेत.आता या 10 जागा कोणत्या आहेत, याची माहिती मिळू शकली नाही आहे. पण शरद पवार यांची उमेदवारी यादी येताच, यामध्ये स्पष्टता मिळणार आहे.
advertisement
विशेष म्हणजे निवडणुकीचा अर्ज भरण्यास आता फक्त दोन दिवस उरले आहेत, मंगळवारपर्यंत अर्ज भरण्याची मुभा सर्व पक्षांना आहे.त्यामुळे हा अवधी पाहता आज काही करून सर्वच पक्ष आपली उमेदवारी जाहीर करतील अशी शक्यता आहे. खरं तर बंडखोरी आणि फाटाफुट होऊ नये यासाठी सर्व पक्ष यादी जाहीर करण्यास वेळ लावत आहेत.
महायुतीच जागावाटप ठरलं
view commentsमहायुतीची रंगशारदामधील बैठक पार पडल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी या बैठकीचा तपशील दिला आहे.227 जागा जागांवर आमचे उमेदवार ठरले आहेत. 200 जागांवर आमचे एकमत झाले आहे.आणि 27 जागांवर देखील आमचे उमेदवार ठरले असून विरोधकांचे त्या 27 जागांवर उमेदवार कोण असणार आहेत, यानंतर आम्ही आमचे उमेदवार ठरवणार असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले आहे.जागावाटपसंदर्भातला कोणताही तिढा नाही
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 6:44 PM IST











