Solapur: गळाभर सोन्याच्या माळा घालून तृतीयपंथीयाची भावी नगरसेवक पोस्ट, जवळच्या तिघांची नियत फिरली; खुनाचं गुढ उकललं

Last Updated:

धक्कादायक म्हणजे, तिन्ही आरोपी हे अयुब सय्यद यांच्या ओळखीतले होते. ओळखीचा फायदा घेऊन तिन्ही आरोपींनी शुक्रवारी रात्री

News18
News18
प्रितम पंडित, प्रतिनिधी 
सोलापूर : सोलापूरमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वत्र तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. अशातच एका तृतीयपंथीय इच्छुक उमेदवाराची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. अखेरीस सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवघ्या ६ तासांच्या तपासात हत्येचं गुढ उकललं आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी अयुब हुसेन सय्यद यांचा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोलापुरातल्या लष्कर परिसरात दोन दिवसांपूर्वी अय्युब सय्यद यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अय्युब सय्यद हे (तृतीयपंथी) पारलिंगी समुदायाचे होते. अय्युब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते. मागील काही दिवसांपासून त्यांनी निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली होती.  पण, अचानक राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला होता.
advertisement
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणातील ३ आरोपींना सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.  शहरातील सदर बझारमधील तृतीयपंथी अयुब हुसेन सय्यद यांचा निर्घृण खून झाला होता. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं होतं. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखा आणि सदर बझार पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई केली.  या व्हिडीओमुळे आरोपी लातूरकडे पळाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
advertisement
त्यानंतर तपास पथके तात्काळ लातूरकडे रवाना झाली. विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या मदतीने कारवाई करत लातूर येथून तिन्ही आरोपींना अटक केली.  यशराज उत्तम कांबळे (२१), आफताब इसाक शेख (२४) आणि वैभव गुरूनाथ पनगुले अशी आरोपींनी नाव आहे.  या तिघांनी अय्युब सय्यद यांचा खून केला. अय्युब सय्यद यांच्या  सोन्याचे दागिने होते. ते लुटण्यासाठी या तिघांनी खुनाचा कट रचला.
advertisement
अय्युब सय्यद यांच्या होते ओळखीचे!
धक्कादायक म्हणजे, तिन्ही आरोपी हे अयुब सय्यद यांच्या ओळखीतले होते. ओळखीचा फायदा घेऊन तिन्ही आरोपींनी शुक्रवारी रात्री अयुब सय्यद यांच्या घरात प्रवेश केला. आणि  तिघांनी मिळून अयुब सय्यद यांचा खून केला. याची कबुलीही तिघांनी पोलिसांकडे दिली आहे. या तिन्ही आरोपींनी सय्यद यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल चोरी केला. एवढंच नाहीतर जाताना मयत सय्यद यांची यामाहा स्कुटीही चोरी केली.
advertisement
सोलापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने हा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक भालचंद्र ढवळे करत आहेत. या प्रकरणीतील तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: गळाभर सोन्याच्या माळा घालून तृतीयपंथीयाची भावी नगरसेवक पोस्ट, जवळच्या तिघांची नियत फिरली; खुनाचं गुढ उकललं
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement