advertisement

मुंबईच्या राजकारणात नवा अध्याय,उद्या होणार मोठी घोषणा; महापालिकेला मिळणार नवा विरोधी पक्षनेता

Last Updated:

मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर दुसरी विशेष सभा उद्या होणार आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
सुमीत सावंत, प्रतिनिधी
मुंबई :  मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेता कोण? उद्या होणार अधिकृत घोषणा होणार आहे. तसेच समित्यांमधील सदस्यांची देखील घोषणा उद्या केली जाणार आहे. मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर दुसरी विशेष सभा उद्या होणार आहे. या विशेष सभेत विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेते पदाची नावे जाहीर करण्यात येणार आहे.
भाजप हा मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत सर्वात अधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचे गटनेते गणेश खणकर हे सभागृह नेते होतील. तर शिवसेना (ठाकरे) पक्षा हा दुसऱ्या क्रमांकावरचा मोठा विरोधी गटातील पक्ष असून या पक्षाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेत्या म्हणून होणार आहे. दोन्ही पक्षाकडून महापौरांना प्राप्त झालेल्या पत्रानुसार महापौर या दोन्ही गटनेत्यांची अनुक्रमे सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते म्हणून नावे जाहीर करणार आहे.
advertisement

समित्यांवरील नियुक्त सदस्यांची नावे उद्या जाहीर होणार  

मुंबई महानगरपालिकेत स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट या चार वैधानिक समित्या असून या चारही समित्यांवरील नियुक्त सदस्यांची नावे उद्या जाहीर केले जातील. सदस्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर येत्या 20 फेब्रुवारीला शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होईल. यासाठी 18 फेब्रुवारी रोजी दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांना सादर केले जाणार आहेत.
advertisement

कोणत्या पक्षाचे किती सदस्य? 

  • स्थायी समिती ( एकूण सदस्य 26) - भाजप - 10, शिवसेना शिंदे - 04, शिवसेना ठाकरे - 07, काँग्रेस - 03, मनसे - 01, एमआयएम - 01
  • सुधार समिती (एकूण 26) - भाजप - 10, शिवसेना - 04, शिवसेना ठाकरे 07, काँग्रेस - 03, मनसे - 01, एमआयएम - 01
  • शिक्षण समिती (एकूण - 22) - भाजप - ९ शिवसेना शिंदे - 3, शिवसेना ठाकरे - 6, काँग्रेस - 2, एमआयएम - 1
  • बेस्ट समिती (एकूण सदस्य 16) : भाजप - 6, शिवसेना शिंदे - 2, शिवसेना ठाकरे - 5, काँग्रेस - 2, एमआयएम - 1
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईच्या राजकारणात नवा अध्याय,उद्या होणार मोठी घोषणा; महापालिकेला मिळणार नवा विरोधी पक्षनेता
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement