Sachin Pilgaonkar: 'कुणाची हिंमत आहे का?', सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांवर अशोक मामा संतापले, सुनावले खडे बोल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ashok Saraf got angry at trollers: आपल्या जिवलग मित्रावर होणारी चिखलफेक पाहून आता खुद्द ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मैदानात उतरले आहेत.
advertisement
advertisement
एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी सचिन पिळगांवकरांची पाठराखण केली. ते म्हणाले, "जेव्हा मी सचिनला ट्रोल होताना पाहतो, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. सचिनने आज जे स्थान मिळवलंय, ते काही फुकट किंवा वारशाने मिळालेलं नाही. त्यासाठी त्याने रक्ताचं पाणी केलंय. अगदी लहान वयापासून त्याने दिग्दर्शन केलं, असिस्टंट म्हणून राबला, संगीत दिलं आणि एडिटिंगचं तंत्रही आत्मसात केलं. आज त्याला प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास आहे."
advertisement
अशोक मामा पुढे म्हणाले, "आता लोक काय बोलतात? तो काय बोलला यावरून त्याला ट्रोल केलं जातंय. त्याच्या ज्ञानावर कुणी एक तरी बोट ठेवून दाखवेल का? कुणाची हिंमत आहे का? कुणीच करू शकत नाही, कारण ट्रोल करणाऱ्यांना हे माहितच नसतं की समोरच्या माणसाने किती मेहनत घेतली आहे. आजकाल ट्रोल करणं हा लोकांचा फावल्या वेळचा छंद झाला आहे."
advertisement
सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. पण सोशल मीडियाच्या जमान्यात कुणीही उठतं आणि काहीही कमेंट करतं. यावर भाष्य करताना मामांनी खोचक टोला लगावला. ते म्हणाले, "काही लोक तर टपूनच बसलेले असतात. हा माणूस कुठे काही बोलतोय का? कुठे एखादं वाक्य सापडतंय का? सापडलं की सुरू झाली ट्रोलिंग. पण ही लोकं हे विसरतात की ज्याला ते ट्रोल करत आहेत, त्याच्या पायाच्या नखाचीही सर त्यांना नाहीये."
advertisement
advertisement






