Today Horoscope : आज हनुमान जयंती! ६ राशींवर होणार विशेष कृपा, साडेसाती जाणार, संकट टळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Hanuman Jayanti 2026 : वैदिक पंचांगानुसार आज, २ एप्रिल २०२६ रोजी गुरुवार असून हनुमान जयंतीचा पवित्र योग आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मुंबई : वैदिक पंचांगानुसार आज, २ एप्रिल २०२६ रोजी गुरुवार असून हनुमान जयंतीचा पवित्र योग आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आज ग्रहांचा दुर्मिळ संयोग घडत असून त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येण्याची शक्यता आहे. बजरंगबलीच्या कृपेने अनेकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी ठरू शकतो. चला जाणून घेऊया, आजचे राशीभविष्य…
मेष (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या व्यक्तींना आज चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा वाढेल. अचानक सुखसोयींची वाढ झाल्याने थोडा गोंधळही जाणवू शकतो.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आज भाग्याची साथ मिळणार असल्याने नवीन संधींचा लाभ घ्या. मेहनत केल्यास यश निश्चित मिळेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
उच्च पदावरील व्यक्तींशी संपर्क वाढवणे फायदेशीर ठरेल. योग्य संधीचा लाभ घेतल्यास कामात गोडी वाढेल.
advertisement
कर्क (Cancer Horoscope Today)
महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल. मात्र, यश मिळवण्यासाठी मेहनतही तितकीच घ्यावी लागेल.
सिंह (Leo Horoscope Today)
तुमच्या बोलण्याचा प्रभाव आज अधिक जाणवेल. योग्य शब्दांची निवड केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू शकते.
कन्या (Virgo Horoscope Today)
सडेतोड स्वभावामुळे टीकेला सामोरे जावे लागू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा आर्थिक ताण वाढू शकतो.
advertisement
तूळ (Libra Horoscope Today)
वैवाहिक जीवनात काही तणाव जाणवू शकतो. प्रसिद्धीच्या संधी मिळतील, पण त्यासाठी कष्टही घ्यावे लागतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
व्यवसायात योग्य लोकांशी संपर्क साधण्यात यश मिळेल. त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आरोग्य टिकवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. मानसिक ताणाचा परिणाम शरीरावर दिसू शकतो.
advertisement
मकर (Capricorn Horoscope Today)
विशेषतः महिलांनी व्यापक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. केलेल्या प्रयत्नांचे फळ लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
आध्यात्मिक साधना आणि उपासना केल्याने मानसिक शांतता मिळेल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद होऊ शकतात.
मीन (Pisces Horoscope Today)
आज सामंजस्याची भूमिका ठेवणे महत्त्वाचे आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना पार्टनरच्या स्वभावाशी जुळवून घ्यावे लागेल.
advertisement
(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 6:42 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Today Horoscope : आज हनुमान जयंती! ६ राशींवर होणार विशेष कृपा, साडेसाती जाणार, संकट टळणार










