advertisement

पुण्यात हक्काचं घर घ्याययचंय? अचानक शहरातील 'या' भागात वाढणार घर खरेदी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Last Updated:

रेडीरेकनरचे दर न वाढल्यामुळे स्टॅम्प ड्युटी आणि इतर करांचा बोजा वाढणार नाही. याचा थेट फायदा रावेत, किवळे, पुनावळे, मोशी आणि चऱ्होली यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागांना होणार आहे

घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे (प्रतिकात्मक फोटो)
घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी चिंचवड : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने यंदा रेडीरेकनरचे दर स्थिर ठेवल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात घरांच्या किमती वाढणार नाहीत. यामुळे विशेषतः शहराच्या उपनगरांमध्ये गृहखरेदीला मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या उत्पन्नात मात्र मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.
या भागांत वाढणार घरांची मागणी
रेडीरेकनरचे दर न वाढल्यामुळे स्टॅम्प ड्युटी आणि इतर करांचा बोजा वाढणार नाही. याचा थेट फायदा रावेत, किवळे, पुनावळे, मोशी आणि चऱ्होली यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागांना होणार आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू असून, आता मध्यमवर्गीयांचा कल या भागात घर घेण्याकडे वाढणार असल्याचे रिअल इस्टेट तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
महापालिकेच्या उत्पन्नात ८६ कोटींची घट
एकीकडे घर खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण असताना, महापालिकेच्या तिजोरीत मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत ८६ कोटी ५३ लाख रुपयांची घट झाली आहे. सहशहर अभियंता सुनील भागवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२५-२६ चे उत्पन्न हे ७९४ कोटी ७७ लाख रुपये मिळालं. तर, गतवर्षीचे उत्पन्न हे ८८१ कोटी ३० लाख रुपये इतकं होतं.
advertisement
महसूल घटण्याची मुख्य कारणे
महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्राच्या पर्यावरण विभागाचे 'ईएस प्रमाणपत्र' अनिवार्य केल्यामुळे अनेक प्रस्तावांना विलंब झाला. तसेच, जमीन मोजणी प्रक्रियेवर काही काळ असलेल्या स्थगितीमुळे नवीन बांधकामांच्या परवानग्यांचा वेग मंदावला, ज्याचा थेट परिणाम महापालिकेच्या महसुलावर झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात हक्काचं घर घ्याययचंय? अचानक शहरातील 'या' भागात वाढणार घर खरेदी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement