काळा नाहीच! सोमवती अमावास्येला चुकूनही घालू नका 'या' रंगाचे कपडे, अन्यथा ही चूक पडेल महागात
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सोमवार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी अत्यंत दुर्मिळ असा 'सोमवती अमावास्येचा' योग जुळून आला आहे. महाशिवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी आलेली ही अमावास्या आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
सोमवार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी अत्यंत दुर्मिळ असा 'सोमवती अमावास्येचा' योग जुळून आला आहे. महाशिवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी आलेली ही अमावास्या आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पितृदोषातून मुक्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी व्रत केले जाते. मात्र, या विशेष दिवशी आपल्या कपड्यांच्या रंगाबाबत एक अत्यंत महत्त्वाची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
advertisement
advertisement
16 फेब्रुवारीला शनी आणि राहूचा प्रभाव विशिष्ट नक्षत्रांवर असल्याने, या दिवशी गडद निळ्या रंगाचे कपडे घातल्याने मनामध्ये नकारात्मक विचार, नैराश्य आणि अस्वस्थता वाढू शकते. अमावास्येच्या दिवशी चंद्राचे बळ कमी असते, अशा स्थितीत राहूचा दर्शक असलेला डार्क ब्लू रंग तुमच्या ऊर्जेचा ऱ्हास करू शकतो. यामुळे बनत आलेली कामे बिघडणे किंवा विनाकारण चिडचिड होणे असे प्रकार घडू शकतात.
advertisement
advertisement
पांढऱ्या वस्त्रांना प्राधान्य द्या: सोमवार आणि सोमवती अमावास्येला पांढरा, ऑफ-व्हाईट किंवा चंदेरी रंगाचे कपडे घालणे सर्वात शुभ मानले जाते. यामुळे मनाला शांती मिळते आणि चंद्राचा आशीर्वाद प्राप्त होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








