advertisement

IND vs PAK : 'मला एक तरी पुरावा दे...', मॅचआधी मांजरेकरांवर जडेजा भडकला, Photo दाखवून केली बोलती बंद!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याआधी संजय मांजरेकर यांनी हस्तांदोलनावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यानंतर भारतीय क्रिकेटपटू जडेजाने मांजरेकर यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
1/6
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या टी-20 वर्ल्ड कप मॅच भोवतीचा वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीये. वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवणार का नाही? याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.

2/6
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या आशिया कपवेळी टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. यानंतर आता वर्ल्ड कपमध्ये हस्तांदोलन करणार का नाही? असा प्रश्न सूर्यकुमार यादवला विचारण्यात आला, त्यावर त्याने 24 तास थांबा, असं उत्तर दिलं.

3/6
हस्तांदोलनावरून भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हस्तांदोलन करायचं नाही, हा मूर्खपणा भारतीय टीमने सुरू केला आहे. आपल्यासारख्या देशाला हे शोभणारे नाही. एकतर खिलाडूवृत्तीने खेळा किंवा अजिबात खेळू नका, असं मांजरेकर म्हणाले आहेत.

4/6
संजय मांजरेकर यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने सोशल मीडियावरूनच संजय मांजरेकर यांना सुनावलं आहे. संजय मांजरेकर यांना उत्तर देताना अजय जडेजाने पाकिस्तानी क्रिकेटपटू फहीम अश्रफ याचा फोटो शेअर केला आहे.

5/6
'संजय मला एखादा भारतीय क्रिकेटर दाखव, ज्याने ऑपरेशन सिंदूर वेळी पाकिस्तानला चिडवलं. तुला एकही सापडणार नाही, हाच फरक आहे. हस्तांदोलन करणं बंधनकारक नाही', असं अजय जडेजा म्हणाला आहे.

6/6
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी क्रिकेटपटू फहीम अश्रफ याने वादग्रस्त पोस्ट केली होती, ज्यात त्याने पाकिस्तानी जवान तिरंगा साडी घातलेल्या भारतीय महिलेला सिंदूर लावताना दाखवण्यात आला होता. संजय मांजरेकरना प्रत्युत्तर देताना अजय जडेजाने हाच फोटो शेअर केला आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement