Bombil Fry Recipe: घरगुती मसाले वापरून बनवा चवीष्ट आणि चमचमीत बोंबील फ्राय, चव अशी की बोटं चाटत राहाल
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
महाराष्ट्रीयन बोंबील फ्राय एक कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थाची कृती आहे, ज्यात बोंबील माशाला मसाले लावून रव्याच्या मिश्रणात घोळवून तळले जाते.
महाराष्ट्रीयन बोंबील फ्राय एक कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थाची कृती आहे, ज्यात बोंबील माशाला मसाले लावून रव्याच्या मिश्रणात घोळवून तळले जाते. हा पदार्थ कोकणी आणि महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. बोंबील फ्राय हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय माशाचा पदार्थ आहे जो स्वच्छ केलेल्या आणि झणझणीत मसाल्यात मॅरीनेट केला जातो.ही डिश कोकणी आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
मसालेदार आणि कुरकुरीत असलेले नॉनव्हेज मधे लहान मुलांपासून सर्वच आवडीने खातात. ताजे आणि फ्रेश बोंबील फ्राय झणझणीत आगरी पद्धतीत कोणतेही मसाले न वापरता घरच्या पद्धतीत आपण चविष्ट आणि कुरकुरीत बनू शकतो बोंबील फ्राय. बोंबील स्वच्छ करून घ्या. हळद, तिखट, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस लावून मॅरीनेट करा. त्यानंतर, रवा किंवा तांदळाच्या पिठात घोळवून तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
advertisement
साहित्य
10 स्वच्छ केलेले बोंबील
2 चमचे हळद
3 ते 4 चमचे मसाला
8 ते 9 लसणाच्या पाकळ्या
2 चमचा लिंबाचा रस
चवी नुसार मीठ
4 चमचे तांदळाचे पीठ किंवा रवा (बोंबील घोळवण्यासाठी)
तळण्यासाठी तेल
कृती: मॅरीनेशन: स्वच्छ केलेले बोंबील एका भांड्यात घ्या. त्यात हळद, लाल तिखट,लसूण, कडिपत्ता, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व मसाले बोंबीलला व्यवस्थित लागतील असे लावा. हे मिश्रण सुमारे १५मिनिटे मॅरीनेट होण्यासाठी बाजूला ठेवा.
advertisement
कोटिंग: एका ताटात तांदळाचे पीठ किंवा रवा घ्या. मॅरीनेट केलेले बोंबील पिठात घोळवून घ्या जेणेकरून सर्व बाजूंनी पिठाचे आवरण येईल.तळणे: एका कढईत तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात पिठात घोळवलेले बोंबील टाका. बोंबील दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.सर्व्ह करा: कुरकुरीत बोंबील फ्राय तयार आहे. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 29, 2025 8:54 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Bombil Fry Recipe: घरगुती मसाले वापरून बनवा चवीष्ट आणि चमचमीत बोंबील फ्राय, चव अशी की बोटं चाटत राहाल








