Mumbai Local: फुकट्या पासधारकांचा गेमओव्हर, मध्य रेल्वेकडून स्पेशल प्लॅनिंग, आता सुटका नाही!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
रेल्वेकडून आता टीसींना बनावट तिकीट ओळखण्याचे प्रशिक्षण दिले आहे. रेल्वेकडून बनावट तिकिट विकणाऱ्यांवर आणि खरेदी करणाऱ्यांवर मध्य रेल्वेकडून आळा घालण्याचे काम केले जात आहे.
लोकलने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बनावट तिकीट अथवा पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता रेल्वेकडून कारवाई केली जाणार आहे. कारण की, रेल्वेकडून आता टीसींना बनावट तिकीट ओळखण्याचे प्रशिक्षण दिले आहे. सोबतच मोबाईलच ही वाटप करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर अनेक प्रवाशांचे बनावट तिकीट पकडण्यात आले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेकडून बनावट तिकिट विकणाऱ्यांवर आणि खरेदी करणाऱ्यांवर मध्य रेल्वेकडून आळा घालण्याचे काम केले जात आहे.
मध्य रेल्वेकडून टीसींना विशेष धडे दिले जात आहेत. वेळीच या प्रकरणाला आळा घालण्यासाठी रेल्वेकडून टीसींना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुस्तिका सुद्धा तयार केली असून, ती सर्व टीसींना देण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुढे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, गेल्या तीन महिन्यांपासून सर्व टीसींना बनावट तिकीट स्कॅन करून ओळखता यावे, यासाठी मोबाइलही दिले आहेत. या मोबाइलमध्ये 'टीटीई' नावाचे ॲप देखील आहे. मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून दिले असून या ॲपच्या माध्यमातून टीसी प्रवाशांवर कारवाई करणार आहेत.
advertisement
गेल्या तीन महिन्यांमध्ये मध्य रेल्वेवर सात बनावट तिकिटांची प्रकरणे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यापैकी चार प्रवाशांवर रेल्वेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एआयच्या माध्यमातून काही रेल्वे प्रवाशांनी मासिक पास काढला होता. त्यांच्यावर सुद्धा रेल्वेकडून कारवाई करण्यात आली होती. या सर्वांना आळा घालण्यासाठी रेल्वेने आता टीसींनाच विशेष प्रशिक्षण दिले. दरम्यान, टीसी प्रशांत कांबळे यांनी नोव्हेंबरमध्ये विद्याविहार स्टेशनमध्ये तीन बनावट तिकिटांची प्रकरणे उघडकीस आणली होती. त्या तीनही प्रवाशांवर रेल्नेकडून एफआयआर दाखल करण्यात आली होती.
advertisement
तर डिसेंबरमध्ये सुद्धा एसी लोकलचा एक बनावट पास शोधला आहे. संबंधितावर रेल्वेकडून सध्या कारवाई सुरू आहे. टीसी विशाल नवले यांनी नोव्हेंबरमध्ये तपासणीदरम्यान, एका प्रवाशाकडे एसी लोकलचा बनावट पास आढळून आला होता. सुजाता काळगावकर नावाच्या टीसीनेही बनावट पास पकडला होता. टीसी कुणाल सावर्डेकर यांनी गेल्या आठवड्यात गुरुवारी भायखळा येथे बनावट तिकीट पकडून त्या प्रवाशावर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 8:22 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: फुकट्या पासधारकांचा गेमओव्हर, मध्य रेल्वेकडून स्पेशल प्लॅनिंग, आता सुटका नाही!









