advertisement

Central Railway: प्रयागराज दर्शन सोप्पं! मुंबईतून 44 स्पेशल ट्रेन, लगेच पाहा वेळापत्रक

Last Updated:

Central Railway: होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात प्रयागराजला जाणं सोप्पं होणार आहे. मध्य रेल्वेनं मोठी घोषणा केली आहे.

Central Railway: प्रयागराज दर्शन सोप्पं! उन्हाळ्यात मुंबईतून 44 स्पेशल ट्रेन, लगेच पाहा वेळापत्रक
Central Railway: प्रयागराज दर्शन सोप्पं! उन्हाळ्यात मुंबईतून 44 स्पेशल ट्रेन, लगेच पाहा वेळापत्रक
मुंबई: उन्हाळ्याची चाहूल लागताच मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि प्रयागराज दरम्यान 44 साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष सेवेमुळे होळी व उन्हाळी हंगामातील अतिरिक्त प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान एकूण 44 फेऱ्या चालवण्यात येणार असून प्रत्येकी 22 सेवा दोन्ही दिशांनी असतील. ट्रेन क्रमांक 04102 ही साप्ताहिक विशेष गाडी 17 फेब्रुवारी 2026 ते 14 जुलै 2026 या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायं 16.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायं 17.00 वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. या गाडीच्या 22 सेवांपैकी 4 सेवा 17 फेब्रुवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 आणि 07 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान अतिरिक्त विशेष म्हणून चालवण्यात येतील. 03 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत 5 फेऱ्या होळी विशेष म्हणून तर 21 एप्रिल 2026 ते 14 जुलै 2026 या दरम्यान 13 फेऱ्या उन्हाळी विशेष म्हणून धावतील.
advertisement
परतीच्या दिशेने ट्रेन क्रमांक 04101 ही साप्ताहिक विशेष गाडी 16 फेब्रुवारी 2026 ते 13 जुलै 2026 दर सोमवारी सायं 18.00 वाजता प्रयागराज येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 14.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्याही 22 सेवा नियोजित असून 4 सेवा अतिरिक्त विशेष, 5 सेवा होळी विशेष आणि 13 सेवा उन्हाळी विशेष म्हणून चालवल्या जातील.
advertisement
थांबा कुठे?
या विशेष गाड्यांना कल्याण, इगतपुरी (फक्त 04102 साठी), नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर येथे थांबा देण्यात येईल. गाडीची रचना एक वातानुकूलित द्वितीय, 4 वातानुकूलित तृतीय, 9 शयनयान, 8 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसन तसेच सामानासह 2 गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.
ट्रेन क्रमांक 04102 साठी आरक्षण 14 फेब्रुवारी 2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in वर सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट UTS प्रणालीद्वारे उपलब्ध राहील. प्रवाशांना अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲपचा उपयोग करता येईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway: प्रयागराज दर्शन सोप्पं! मुंबईतून 44 स्पेशल ट्रेन, लगेच पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement