advertisement

Railway Update: कोल्हापूरकरांचं स्वप्न साकार! रेल्वे आता सुसाट सुटणार, निधी मंजूर अन् कामही सुरू

Last Updated:

Kolhapur Miraj Railway: कोल्हापूर ते मिरज सुमारे 47 किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

Railway Update: कोल्हापूरकरांचं स्वप्न साकार! रेल्वे आता सुसाट सुटणार, निधी मंजूर अन् कामही सुरू!
Railway Update: कोल्हापूरकरांचं स्वप्न साकार! रेल्वे आता सुसाट सुटणार, निधी मंजूर अन् कामही सुरू!
कोल्हापूर: गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी होत होती. आता ही मागणी पूर्ण होणार असून रेल्वे सुसाट धावणार आहे. नुकतेच कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 964 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे.
कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग एकेरी आहे. त्यामुळे नव्या गाड्या कोल्हापुरातून सुरू करणे तसेच रेल्वे गाड्यांचे क्रॉसिंग याला मर्यादा येतात. कोल्हापूर ते मिरज या 47 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण व्हावे, ही कोल्हापूरकरांची प्रदीर्घकाळची मागणी आहे. आता रेल्वे मंत्रालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून 964 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे.
advertisement
असे होतील फायदे
निधी मंजूर झाल्यामुळे कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. सुमारे 47 किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यावर लांब पल्ल्याच्या नव्या रेल्वे गाड्या कोल्हापुरातून सुरू होऊ शकतील. शिवाय "वंदे भारत'सारख्या नव्या आलिशान रेल्वे गाड्या देखील कोल्हापूरला मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही महाडिक यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Railway Update: कोल्हापूरकरांचं स्वप्न साकार! रेल्वे आता सुसाट सुटणार, निधी मंजूर अन् कामही सुरू
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement