advertisement

विज बिलाचं टेन्शन नाही, शुन्य खर्चात चालणारा AC, चिमुरड्या पोरीची भन्नाट आयडिया PHOTOS

Last Updated:
वीजदर वाढत आहेत आणि एसीची मागणी वाढली आहे. आम्ही विचार केला आणि सोलर पॅनल, थर्माकोल बॉक्स, आईस बॉक्स, दोन एक्झॉस्ट फॅन आणि बॅटरी वापरून हा एसी बनवला.
1/5
वाढत्या उष्णतेत आणि वाढत्या वीजबिलाच्या काळात सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमधील अकरावी सायन्सच्या विद्यार्थिनींनी एक अनोखा एसी तयार केला आहे. सोलापूर शहरातील विडी घरकुल येथे राहणाऱ्या तनुश्री दोडे आणि तिच्या मैत्रिणींनी सोलर पॅनलवर चालणारा प्रदूषणमुक्त सोलर एनेबल एअर कंडिशनर तयार केला आहे.

2/5
हा एसी केवळ विजेची बचत करत नाही. तर बाहेरील दूषित हवा फिल्टर करून शुद्ध थंड हवा पुरवतो.

3/5
तनुश्री दोडेने सांगितले, वीजदर वाढत आहेत आणि एसीची मागणी वाढली आहे. आम्ही विचार केला आणि सोलर पॅनल, थर्माकोल बॉक्स, आईस बॉक्स, दोन एक्झॉस्ट फॅन आणि बॅटरी वापरून हा एसी बनवला.

4/5
दिवसा सोलरवर चालतो आणि रात्री बॅटरीवर 8 ते 9 तास टिकतो. त्यामुळे विजेची गरजच नाही. 10 बाय 10 च्या खोलीत हा एसी तापमान 3-4 अंश सेल्सिअसने खाली आणतो आणि स्वच्छ हवा देतो.

5/5
मार्केटमधील एसी महाग असतात, वीजबिल येतं आणि मेंटेनन्स खर्चिक असतो. पण हा एसी फक्त 8 हजार रुपयांत तयार होतो आणि मेंटेनन्सचा खर्च नाही. हा शोध शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाच्या दिशेने मोठा टप्पा आहे. अशा नवकल्पना बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा आहे. तर हा प्रोजेक्ट पाहण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement