Dnyanada Kadam : उरले काही तास, येतेय ज्ञानदा; पाहत राहा न्यूज18 लोकमत

Last Updated:

‘काय सांगशील ज्ञानदा…’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येकाच्या ओळखीचं आणि लक्ष वेधून घेणारं वाक्य आणि त्यानंतर समोरून बातमीची खडान खडा माहिती देणारी ज्ञानदा कदम. हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून जुळलं.

मुंबई : गेल्या दीड दशकांपासून मराठी टीव्ही न्यूज इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाने आणि दमदार अँकरिंगमुळे घराघरात पोहोचलेला चेहरा आता न्यूज18 लोकमतवर पाहण्यास मिळणार आहे. चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आता सोमवारपासून म्हणजेच 5 ऑगस्टपासून रोज ज्ञानदा तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. बातम्यांच्या जगातून निवडक, वेचक, वेधक बातम्या सांगण्यासाठी येणार आहे. बातम्यांचा ३६० अँगल तुम्हाला सांगण्यासाठी सोमवारी म्हणजेच 5 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर ज्ञानदा दिसणार आहे.
‘काय सांगशील ज्ञानदा…’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येकाच्या ओळखीचं आणि लक्ष वेधून घेणारं वाक्य आणि त्यानंतर समोरून बातमीची खडान खडा माहिती देणारी ज्ञानदा कदम. हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून जुळलं. अलीकडे तर तसं सोशल मीडियावर ज्ञानदाचा ट्रेंडच होता. पहिल्यांदाच मराठी न्यूज इंडस्ट्रीमध्ये एखाद्या महिला स्टार अँकरच्या बाबतीत असा ट्रेंड सोशल मीडियावर पाहण्यास मिळाला होता.
advertisement
गेली 17 वर्ष एका वृत्तसंस्थेत काम केल्यानंतर ज्ञानदाने काळाची पावलं ओळखत ‘स्क्रिन’ बदलण्याचा निर्णय घेतला. आणि आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचलेलं निर्भीड, अचूक बातम्या आणि सामाजिक जाण बाळगणाऱ्या न्यूज18 लोकमत वृत्तवाहिनीतून ज्ञानदा ही आपली सेकंड इनिंग सुरू केली आहे.
ज्ञानदाबद्दल सांगायचं झालं तर तिचे मूळ कुटुंब कणकवली, सिंधुदुर्ग येथील आहे. ज्ञानदाचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या गांधी बालमंदिर हायस्कूल इथं झालं. मुंबईच्या व्ही .जी. वझे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. तिने व्हॉइस कल्चरवर कोर्स पूर्ण केला. त्यानंतर तिने एका वृत्तवाहिनीत मुख्य वृत्तनिवेदिका अर्थात न्यूज अँकर म्हणून कामाला सुरुवात केली. अँकरिंगसह तिने फिल्डवरही रिपोर्टिंग उत्तमरित्या काम केलं आणि करत आहेत.
advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानदा आणि बातम्या हे समीकरण बनलंय. आता हेच समीकरण आता नव्या रंगात आणि नव्या ढंगात तुमच्या लाडक्या न्यूज 18 लोकमतवर ऐकायला आणि पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे काय सांगशील नव्हे तर ज्ञानदाच आता इथं सगळं सांगणार आहे, त्यामुळे पाहत राहा न्यूज18 लोकमत…
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Dnyanada Kadam : उरले काही तास, येतेय ज्ञानदा; पाहत राहा न्यूज18 लोकमत
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement