Mumbai Pune Expressway: पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर आजपर्यंत असं कधीचं घडलं नाही! तब्बल 14 तासांनतर... PHOTOS
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Mumbai Pune Expressway Traffic Update: सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक मुंबईकर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आज दिवसभर मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे लेनवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
पुणे- मुंबई एक्सप्रेसवे, मुंबई- गोवा महामार्गासोबतच आता मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेसवे वरही सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली असून, सर्वच प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेसवे वर 14 तासानंतर ही धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक मुंबईकर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आज दिवसभर मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे लेनवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या अनेक वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एक्स्प्रेसवे वर टोल स्वरूपात सरकार जनतेकडून अमाप पैसा वसूल करतो. तरीही देखील जनतेला कोणतीच सुविधा पुरवली जात नाही. तसेच द्रुतगतीवर वाहनांची संख्या वाढली तर उपाययोजना करण्याची गरज असताना IRB टोल वसूल करण्यात गुंतले आहेत. तर यावर तोडगा काढण्यासाठी महामार्ग पोलीसांनी 15- 15 मिनिटांचे ब्लॉक घेतले परंतु त्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणारी लेनवर ही भयंकर वाहतूक कोंडी असल्याचं चित्रं दिसून येत आहे. 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) आणि जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने पुण्याकडे आणि लोणावळा- महाबळेश्वरकडे पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत.
advertisement
यामुळे मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेसवेवर वाहनांचा ओघ प्रचंड वाढला असून खंडाळा घाटात 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः अमृतांजन पुलाजवळ आणि घाट परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी तैनात आहे. काही ठिकाणी 'ब्लॉक' देऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनी संयम राखावा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 9:27 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pune Expressway: पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर आजपर्यंत असं कधीचं घडलं नाही! तब्बल 14 तासांनतर... PHOTOS








