वरळी सी- लिंकवर भीषण अपघात; भरधाव कारने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवर मृत्यू
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई : वरळी लिंक कोस्टल रोडवर सोमवारी सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. व्हिआयपी बंदोबस्ताची जबाबदारी पार पडत असताना भरधाव चारचाकीने धडक दिली. या भीषण धडकेत
त्यांचा जागेवर मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी वरळी कोस्टल रोडवर बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी उभे होते. त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत हवालदार दत्तात्रय कुंभार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच वेळी त्यांच्यासोबत ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात
या अपघातानंतर कोस्टल रोडवर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करून अपघातग्रस्त वाहन व जखमींना रुग्णालयात हलवले. धडक देणाऱ्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून अपघाताबाबत चौकशी सुरू आहे. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळेच अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
advertisement
पोलीस दलात हळहळ
हवालदार दत्तात्रय कुंभार हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोस्टल रोडवर या आधीही वेगमर्यादा पाळल्या जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. पोलिसांनी वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 3:34 PM IST