Mhada Lottery 2026 : नवीन वर्षात खरेदी करा हक्काचं घर, म्हाडाची मुंबई, पुणे आणि कोकणात बंपर लॉटरी, असा आहे प्लॅन
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवे वर्ष 2026 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळ, कोकण मंडळ आणि पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
मुंबई : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवे वर्ष 2026 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळ, कोकण मंडळ आणि पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे किंवा पुण्यात आपल्या हक्काचं आणि स्वत:चं घर खरेदी करण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार ,आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सोडतीबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. मुंबई, कोकण आणि पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाने मुंबबईसह राज्यभरातील घरबांधणीचे 2030 पर्यंतचे नियोजन केले आहे. एमएमआर ग्रोथ हबमध्ये 8 लाख घरांचे उद्दीष्ट आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण मंडळाकडून सुमारे 2000 घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. यासाठी विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील उपलब्ध घरांचा आढावा घेतला जात असून कोणती घरे सोडतीत टाकता येतील, याची तपासणी सुरू आहे. तर मुंबई मंडळातील लॉटरीत नेमक्या किती घरांचा समावेश असेल याबाबतची माहिती समोर आलेली नाहीये.
advertisement
मुंबईत 6 लाख नवीन घरे
मुंबईत विविध ठिकाणी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, जीटीबी नगर येथील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदन नगर, जोगेश्वरीतील पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर, वरळीतील आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांमुळे सहा लाख नवे घरे उपलब्ध होणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 7:06 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mhada Lottery 2026 : नवीन वर्षात खरेदी करा हक्काचं घर, म्हाडाची मुंबई, पुणे आणि कोकणात बंपर लॉटरी, असा आहे प्लॅन








