advertisement

Mumbai Vijaydurg Ro Ro Service : कोकणवासीयांचा हिरमोड! मुंबई-विजयदुर्ग बोट सेवा अचानक बंद; नेमकं कारण काय?

Last Updated:

Ro-Ro Boat Service : सिंधुदुर्ग अन् कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता नव्याने सुरु झालेली सेवा बंद झालेली आहे.

मुंबई-विजयदुर्ग बोट सेवा अचानक ठप्प
मुंबई-विजयदुर्ग बोट सेवा अचानक ठप्प
मुंबई : रो-रो बोट सेवा हा प्रकल्प सर्वात चर्चेत आलेला होता. मात्र पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरु केलेली ही सेवा गुढीपाडव्याच्या दिवशीच बंद करण्यात आलेली आहे. नेमकं का असं झालं किंवा यामागील कारण कोणती आहेत त्याबाबत जाणून घेऊयात.
सेवा बंद होण्यामागे 'ही' मोठी कारण
मिळालेल्या माहितीनुसार,मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा ही प्रवाशांच्या अतिशय उपयोगी सेवा ठरणारी होती मात्र या सेवेच बंद होण्याची कारण म्हणजे या याचे तिकीट दर खुप जास्त असणे जे सर्वसामान्य लोकांना परवडत नव्हते शिवाय या रो-रो सेवेच्या बोटीत मिळणारे खाद्यपदार्थही अत्यंत महाग त्यामुळे प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागला. या सर्व कारणांमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी वाढली.
advertisement
माजी आमदार परशुराम उपकरण यांनी या सर्व प्रकरणावर टीका केली आहे. त्यात त्यांनी सांगितले की कोणताही प्रकल्प हा सुरु करताना त्याचे योग्य नियोजन तसेच अंमलबजावणी करणे महत्त्वाची असते. पण या बोट सेवेच्या बाबतीत हे सर्व दिसून आलेले नाही.
उपकर यांच्या मते ही सेवा 19 मार्चला बंद करण्यात आली. त्यातही प्रवासी जर मुंबईहून सुटल्यानंतर विजयदुर्ग पोहोचल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नव्हती. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.
advertisement
शिवाय बोटीमध्ये मुलभूत सुविधा नसल्याच्याही तक्राही समोल आल्या. शौचालय किंवा विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा याही पुरेशा नव्हत्या. त्यामुळे पण प्रवाशांचा अनुभव हा समाधानकारक नव्हता. या सर्व कारणांमुळे रो-रो सेवेमध्ये प्रवाशांची संख्या खुपच कमी दिसून येत होती. एका दिवशी 50 पेक्षा जास्त प्रवासीही या सेवेचा वापर करत नव्हते असेही समोर आले आहे.
advertisement
खरं पाहिले तर योग्य नियोजनाचा अभाव,अतिरिक्त खर्च आणि अपुरी सुविधा या सर्व कारणांमुळे ही सेवा काही दिवसांत बंद पडली. त्यामुळेच भविष्यात असे प्रकल्प सुरु करताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Vijaydurg Ro Ro Service : कोकणवासीयांचा हिरमोड! मुंबई-विजयदुर्ग बोट सेवा अचानक बंद; नेमकं कारण काय?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement