मार्चअखेर राज्यात उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यात पारा 40 पार, पाहा हवामान अपडेट, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Mayuri Sarjerao
Last Updated:
राज्यात मार्चअखेर उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 28 मार्च रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय असेल? याबाबत याबाबत अपडेट पाहा.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई: गेल्या काही काळात राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अशातच मार्चअखेर आणखी त्रासदायक होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. अशातच पुढील 4 ते 5 दिवसांत काही जिल्ह्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 28 मार्च रोजी राज्यातील हवामान कसे असेल? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
मुंबईत दमट हवामान
मुंबईतील तापमानाची वाटचाल 40 अंशाच्या दिशेनं सुरु आहे. मुंबईसह उपनगरातील तापमान हे 35 अंशावर जाऊन पोहोचलं आहे. तर पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 28 मार्च रोजी मुंबईतील कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस असणार आहे.
advertisement
पुण्याचं तापमान 39 अंश सेल्सिअस
गेल्या आठवड्यापासून पुणे आणि परिसरात उन्हाच्या झळा जाणवत आहे. कमाल तापमान 38.9 अंशांवर गेलं आहे. 28 मार्च रोजी पुण्यातील किमान तापमान हे 18 तर कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत असणार आहे. दरम्यान येत्या चार-पाच दिवसांमध्ये राज्यात आणखी 2-3 अंश सेल्सिअस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
नाशिकनेही गाठला 40 अंशाचा टप्पा
उत्तर महाराष्ट्रातही पारा चांगलाच वाढला आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान चाळीशी पर्यंत पोहोचलं आहे. 28 मार्च रोजी कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 22 अंश सेल्सिअस असणार आहे.
कोल्हापुरात वाढलं तापमान
कोल्हापुरातही गेल्या काही काळात उष्णता चांगलीच वाढली आहे. 27 मार्च रोजी कोल्हापुरातील तापमान 39 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढं राहिलं. 28 मार्च रोजीही तापमानातील ही स्थिती कायम राहणार आहे.
advertisement
मराठवाड्यात उन्हाच्या झळा
मराठवाड्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान हे 40 अंशापर्यंत पोहोचलं आहे. 28 मार्च रोजी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस असणार आहे. तर किमान तापमान हे 22 अंश सेल्सिअस असणार आहे.
विदर्भात तापमान 40 अंशावर
विदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात पारा चाळीशी पार गेला आहे. 28 मार्चनंतर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 28 मार्च रोजी नागपूरमधील कमाल तापमान हे 40 अंश सेल्सिअस असणार आहे. तर किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस असणार असून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 27, 2024 8:24 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मार्चअखेर राज्यात उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यात पारा 40 पार, पाहा हवामान अपडेट, Video