उन्हाळ्यात प्या आरोग्यदायी नाचणीची आंबील, पाहा बनते कशी? Video

Last Updated:

कोल्हापुरातील गांधी मैदान परिसरात एक तरुण उन्हापासून लोकांना थंडावा मिळावा म्हणून पौष्टिक नाचणीची आंबील विकतोय.

+
उन्हाळ्यात

उन्हाळ्यात प्या आरोग्यदायी नाचणीची आंबील, पाहा बनते कशी? Video

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : उन्हाळ्यात ताक, लस्सी, मठ्ठा, सरबत अशी पेयं पिण्यापेक्षा नैसर्गिकरीत्या शरीराला थंडावा देण्यासाठी फळांचे रस वेगैरे बरेच जण पित असतात. दर उन्हाळ्यात रस्त्याकडेला अनेक स्टॉलवर अशी पेयं विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र कोल्हापुरातील एक तरुण सात्विक उपाय म्हणून स्टॉलवर नाचणीच्या आंबीलची विक्री करण्यास सुरुवात केली. नाचणीच्या आंबीलचे फायदे ज्या लोकांना ठाऊक आहेत ते आवर्जून या ठिकाणी थांबतात.
advertisement
कोल्हापूरच्या गांधी मैदान परिसरात चिन्मय गवळी हा तरुण त्याचा छोटासा फूड स्टॉल चालवतो. त्याच्याकडे रोज संध्याकाळी चिकन फ्राय, बिर्याणी, खांडोळी, खिमा टोस्ट, चिकन टोस्ट, भुर्जी पाव असे पदार्थ मिळतात. मात्र यासोबतच दिवसभर जोडधंदा म्हणून त्याने नाचणी आंबील बनवून विक्री करण्यास सुरू केले आहे. त्याचे पूर्ण कुटुंबच व्यवसायात असून यासाठी त्याची आई त्याला मदत करते. उन्हाने होणारा त्रास कमी करण्यासाठी नाचणी आंबील हे एक पौष्टिक आणि सात्विक पेय आहे, यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. म्हणूनच ताक, लस्सी पेक्षा आंबील विकण्याचे ठरवले, असे चिन्मय गवळी सांगतो.
advertisement
कसे बनवले जाते नाचणी आंबील?
1) नाचणी आंबील हे नाचणीचे पीठ आंबवून बनवले जाते. त्यासाठी जितके नाचणीचे पीठ तितकेच पाणी घालून रात्रभर भिजवत ठेवावे.
2) दुसऱ्या दिवशी गॅस मध्यम आचेवर ठेवून अंबवण्यात आलेले नाचणी पीठ शिजायला ठेवायचे.
3) त्यामध्ये दालचिनी, लवंग, धने यांची पावडर, थोडी हिंग असे एकत्रित मिश्रण करुन 2 वाटी नाचणी आंबील साठी दीड चमचा या प्रमाणात टाकावे. तसेच 7-8 पाकळ्या लसूण थोडा चेचून टाकावे.
advertisement
4) गॅसवर ठेवलेले नाचणी पीठ सतत चमच्याने ढवळत राहावे. 2 वाटी पीठ शिजायला साधारण अर्धा तास वेळ लागतो. नीट शिजवून घेतले तरच आंबील नीट बनते.
5) व्यवस्थित शिजवल्यानंतर हे पीठ थंड करून घ्यावे. त्यामध्ये काही मोठ्या गुठळ्या असतील तर त्या हाताने फोडून घ्याव्यात.
6) थंड झालेले नाचणी पीठ साधारण अर्धा लिटर ताकात मिसळावे. अजून ताक किंवा पाणी हवे असल्यास आवश्यकतेनुसार वाढवावे.
advertisement
दरम्यान, दिवसभर नाचणी आंबील आणि रात्री याच ठिकाणी नॉनव्हेज पदार्थ विक्री करणाऱ्या चिन्मयच्या स्टॉलवर चविष्ट आणि पौष्टिक नाचणी आंबील मुळे गर्दी होत आहे. तर चिन्मयने सांगितलेली कृती वापरून घरी देखील हे आंबील आपण बनवू शकतो.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
उन्हाळ्यात प्या आरोग्यदायी नाचणीची आंबील, पाहा बनते कशी? Video
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement