Shocking Incident : ''बाबा, मी येतो मदतीला...'' हे शेवटचे शब्द ठरले; नालासोपाऱ्यातील चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ
Last Updated:
Construction Accident : नालासोपारा पूर्वेकडील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एक दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
मुंबई : नालासोपारा पूर्वेकडील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत चौकशी सुरू केली आहे.
बापाच्या डोळ्यादेखत लाडक्या लेकाचा अंत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आपल्या वडिलांसोबत बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. इमारतीच्या कामासाठी वापरण्यात आलेले बांबू काढण्याच्या कामात तो वडिलांना मदत करत होता. यावेळी तिसऱ्या मजल्यावर काम सुरू असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली जमिनीवर कोसळला.
खाली पडताच तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थितांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना पाळल्या गेल्या होत्या का तसेच अल्पवयीन मुलाकडून काम करून घेतले जात होते का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 8:34 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : ''बाबा, मी येतो मदतीला...'' हे शेवटचे शब्द ठरले; नालासोपाऱ्यातील चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ








