Mumbai: तरुणपणी केलेल्या गुन्ह्यात म्हातारपणी अटक, 48 वर्षांआधी केलेला गुन्हाही आरोपीला आठवेना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Mumbai: मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ४८ वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यात कुलाबा पोलिसांनी एका ७१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
Crime in Mumbai: मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ४८ वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यात कुलाबा पोलिसांनी एका ७१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. संबंधित आरोपी मागील ४८ वर्षांपासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. आता अखेर ४८ वर्षांनी आरोपीला जेरबंद करण्यात कुलाबा पोलिसांना यश आलं आहे.
मात्र ४८ वर्षांनी अटक झालेल्या आरोपीला स्वत:ने केलेला गुन्हा आठवत नाहीये. या सगळ्यामुळे आश्चर्च व्यक्त केलं जात आहे. पोलिसांनी ४८ वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याची शाहनिशा करून आरोपीला बेड्या ठोकल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आरोपीला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून जेरबंद करण्यात आले. या घटनेमुळे मुंबईसह रत्नागिरीमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९७७ साली घडली होती. त्यावेळी आरोपी चंद्रशेखर मधुकर कालेकर हा २३ वर्षांचा होता. त्याने मुंबईतील एका महिलेवर धारदार चाकूने हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली होती. हल्ला केल्यानंतर लगेचच आरोपी चंद्रशेखर कालेकर मुंबईतून पसार झाला आणि त्यानंतर तब्बल ४८ वर्षे तो पोलिसांच्या हाती लागला नाही.
advertisement
दापोलीतून झाली अटक
४८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर कुलाबा पोलिसांना आरोपी चंद्रशेखर कालेकर हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील करंजणी या गावात राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दापोलीत धाव घेतली आणि सापळा रचून आरोपी चंद्रशेखर कालेकर याला ताब्यात घेतले.
आरोपीचे वय आता ७१ वर्षे झाले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना आरोपीला अटक केल्यानंतर त्याने कोणता गुन्हा केला होता, हेदेखील त्याला नीट आठवत नव्हते. ४८ वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्यात अटक झाल्याचे ऐकून त्याने आश्चर्य व्यक्त केले. पोलिसांनी त्याला मुंबईत आणले असून, जुन्या रेकॉर्ड्सची पडताळणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या दीर्घकाळानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मिळालेले यश कौतुकास्पद ठरले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 11:33 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: तरुणपणी केलेल्या गुन्ह्यात म्हातारपणी अटक, 48 वर्षांआधी केलेला गुन्हाही आरोपीला आठवेना