कोकणकरांच्या सागरी प्रवासावर संकट, मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा 25 दिवसांतच बंद, कारण काय?
Last Updated:
Mumbai–Vijaydurg Ro-Ro Service : जाण्यासाठी रो-रो फेरीतून जाणार होता तर थांबा. याबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे.
मुंबई : कोकणकरांचा प्रवास सोपा करण्यासाठी शुभारंभ करण्यात आलेली मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा ही अवघ्या 25 दिवसांतच स्थगित करण्यात आली आहे. मात्र ही वेळ का आला यामागील कारण काय आहेत त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोकणचं समुद्री स्वप्न अधांतरी
मुंबईतून मोठ्या संख्येने नागरिक वर्षभरात कोकणात प्रवास करत असतात. रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्गाने प्रवास करण्यात वेळ जात असल्याने हा नवा पर्याय काढण्यात आलेला होता. त्यानुसार तब्बल 626 प्रवासी क्षमतेचे एमटूएम प्रिन्सेस जहाज हे मुंबई ते विजयदुर्ग या जलमार्गावर सुरु करण्यासाठी महत्त्वाच्या चाचण्या घेतल्यानंतर 1 मार्चला या दोन मार्गांवर या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
advertisement
त्यानंतर ही सेवा दर बुधवारी आणि शनिवारी भाऊचा धक्का येथून निघत असे आणि गुरुवात आणि रविवार विजयदुर्ग बंदरावर दुपारी 12 वाजता पोहचत असत.
बंद होण्याचं नेमक कारण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार,री रो-रो सेवेच्या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि तांत्रिक कारणामुळे पुढील एक महिना ही रो-रो सेवा बंद राहण्याची शक्यत आहे. सेवेमुळे हा प्रवास अवघ्या सात ते सहा तासांत पूर्ण करता येत होता. पण या सेवेचा प्रवास अत्यंत महागडा असल्याने सामान्य नागरिकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 10:30 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कोकणकरांच्या सागरी प्रवासावर संकट, मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा 25 दिवसांतच बंद, कारण काय?







