advertisement

Mumbai News : गुड न्यूज! पश्चिम रेल्वेचा गेम चेंजर प्लॅन! करी रोड आणि लोअर परेल दरम्यान...

Last Updated:

New Railway Depot : मुंबईत करी रोडजवळ नवीन रेल्वे डेपो उभारला जाणार आहे. 98 कोटींच्या या प्रकल्पामुळे गाड्यांची देखभाल सुधारेल आणि मुंबई सेंट्रल आणि दादरहून अधिक गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेना येणार्‍या दिवसांत अधिक गाड्या सुरु करण्यासाठी आणि सध्याच्या असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी नवीन कोंचिग डेपो उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवा डेपो हा करी रोड आणि लोअर परेल दरम्यान उभारला जाणार असून तब्बल 98 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
नव्या डेपोमध्ये रेल्वे डब्यांची देखभाल शिवाय तपासणी आणि स्वच्छता करण्यासाठी दोन पिट लाइन्स असतील तसेच गाड्या उभ्या ठेवण्यासाठी सात स्टेबलिंग लाइन्स केल्या जाणार आहे. पिट लाइन्सना 31 मार्च रोजी मंजुरी मिळाली होती तर 15 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्धिष्ट समोर आहे. स्टेबलिंग लाइन्सच्या कामालाही लवकर अंतिम मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
सध्या मुंबई सेंट्रल येथील पिट लाइन्स या पूर्ण क्षमतेने वापरात आहेत ज्यामुळे तिथं नवीन गाड्यांसाठी जागाच मिळत नाही. या सर्व कारणामुळे मुंबई सेंट्रल आणि दादर येथून नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या या सुरु करण्यात मोठे अडथळे येत होते. त्यामुळे हा नवा डेपो या समस्येवर उपाय ठरेल.
करी रोड डेपोच का महत्वाचे ठिकाण?
नव्या डेपोसाठी करी रोड ठिकाणही महत्त्वाचे आहे हा डेपो मुंबई सेंट्रलपासून साधारण दोन किमी आणि दादरपासून 2.5 किमी अंतरावर आहे. यामुळे दोन्ही टर्मिनससाठी ते सोयीच ठरेल.
advertisement
एवढेच नाही तर पश्चिम रेल्वे सध्या वंदे भारत, एसी लोकल आणि 15 डब्यांच्या उपनगरीय गाड्यांची संख्या वाढवत आहे. यामुळेही नवीन डेपो येत्या काही दिवसातील वाढ लक्षात घेऊन तयार केला जात आहे. त्यामुळेच आधीच्या पिट लाइन्सवरील ताण कमी होईल आणि नव्या सेवांसाठी जागा मोकळी होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : गुड न्यूज! पश्चिम रेल्वेचा गेम चेंजर प्लॅन! करी रोड आणि लोअर परेल दरम्यान...
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement