advertisement

रात्रीच्या वेळी पनवेल-अलिबाग बस शोधताय? एसटी महामंडळाचा अजब कारभार, प्रवाशांचा मोठा खोळंबा

Last Updated:

Panvel-Alibag Route : पनवेल-अलिबाग मार्गावर रात्री एसटी बस मिळत नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित सेवा बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

News18
News18
नवी मुंबई : रात्रीची वेळ, पनवेल एसटी स्थानक आणि प्रवाशांची वाढती चिंता सध्या अशी परिस्थिती दिसून येत आहे. रात्री साडेआठ नंतर पनवेलहून अलिबाग तसेच रेवदंडा,मुरुडकडे जाणाऱ्या प्रवाशांना एसटी बस मिळत नसल्याने मोठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
एसटी महामंडळाचे प्रवाशांच्या सोयीसीठी हे ब्रीदवाक्य आहे मात्र प्रत्यक्षात तर या मार्गावर सेवा अपुरी पडत आहे, अशा तक्रारी प्रवाशांकडून वारंवार येत आहेत. विशेष म्हणजे अलिबाग-पनवेल- अलिबाग या मार्गावरील शिवशाही बस या रात्रीच्या वेळेत बंद होते,त्यामुळे उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुसरा पर्याय मिळत नाही.
या सर्व परिस्थिती प्रवाशांना खाजगी वाहनं किंवा अनियमित असलेल्या बस सेवांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे अतिरिक्त खर्च प्रवाशांना करावा लागतो शिवाय वेळेचा ही अपव्यय होतो आणि सु्रक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे रोजच्या प्रवासासाठी एसटीवर अवलंबून राहणाऱ्यांना याचा मोठा फटका बसतो.
advertisement
यावर कोणी काय म्हटले?
सामाजिक कार्यकर्ते देवव्रत विष्णु पाटील यांनी यावर नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः एसटीने प्रवास करत नाहीत, त्यामुळे त्यांना सामान्य प्रवाशांच्या अडचणी कळत नाहीत. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रवासी राजेश म्हात्रे यांनी सांगितले की, रात्री 9 नंतर पनवेलहून वडखळकडे जाण्यासाठीही बस सेवा उपलब्ध नसते. अलिबाग मार्गाव्यतिरिक्त इतर कोणतीही बस थांबत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
रात्रीच्या वेळी पनवेल-अलिबाग बस शोधताय? एसटी महामंडळाचा अजब कारभार, प्रवाशांचा मोठा खोळंबा
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement