advertisement

Pankaja Munde PA Wife death : 'मला रात्री 12 वाजता फोन आला...', डॉ. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट!

Last Updated:

Pankaja Munde PA Wife death : गौरी यांची ज्यादिवशी हत्या झाली, त्या दिवशी मलाही रात्री 12 च्या दरम्यान फोन आला होता, असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.

Pankaja Munde PA Wife death
Pankaja Munde PA Wife death
Gauri Palve Garje death Case : पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे यांनी शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. वरळीच्या आदर्श नगर येथील 'महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी'मधील राहत्या घरी गौरी पालवे- गर्जे यांनी गळफास लावून घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आता करुणा मुंडे यांनी या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे.

ज्यादिवशी गौरीची हत्या झाली तेव्हा...

गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. गौरी हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय गौरीच्या माहेरच्या मंडळींनी बोलून दाखवला. अशातच एका वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा मुंडे यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. गौरी यांची ज्यादिवशी हत्या झाली, त्या दिवशी मलाही रात्री 12 च्या दरम्यान फोन आला होता, असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.
advertisement

पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत

मला फोनवर गौरीच्या एका नातेवाईकांनी सांगितलं की, पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत. मग तेव्हा मी सांगितलं की मला पोलिसांशी बोलणं करुन द्या, मी त्यांना तक्रार दाखल करुन घ्या असं सांगितलं होतं, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली. या प्रकरणामागे कोण कोण आहे? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात महिलांची काय अवस्था आहे, हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी दिसत आहे.
advertisement

आत्महत्या नसून हत्या - करुणा मुंडे

बीडमध्ये महिलांची परिस्थिती इतकी बिकट आहे की शाररिक, मानसिक आणि आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरीही शासन काही दखल घेत नाही. ही आत्महत्या नसून हत्या आहे, असं करुणा मुंडे यांनी सांगितलं. मी कुटूंबियांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
advertisement

पंकजा मुंडेंची भूमिका काय?

दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडे सहा ते पावणे सातच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Pankaja Munde PA Wife death : 'मला रात्री 12 वाजता फोन आला...', डॉ. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement