advertisement

मुंबईच्या लोकलमध्ये वाद, मालाड स्टेशनवर शिक्षकाची भोसकून हत्या, 12 तासात आरोपीला बेड्या

Last Updated:

मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री आठ वाजता थरकाप उडवणारी घटना घडली होती. इथं एका प्राध्यापकाची भर रेल्वे स्थानकात धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती.

News18
News18
विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी थरकाप उडवणारी घटना घडली होती. इथं एका प्राध्यापकाची भर रेल्वे स्थानकात धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. लोकलमधून उतरताना झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हत्येत झालं होतं. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे.

नेमकी घटना काय होती?

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर शनिवारी प्रवाशांची मोठी वर्दळ होती. यावेळी अलोक सिंग नावाचे प्राध्यापक लोकलमधून उतरत असताना, गर्दीमुळे त्यांचा दुसऱ्या एका प्रवाशाशी धक्का लागला. या धक्क्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या आरोपी ओंकार शिंदेनं अलोक सिंग यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने सिंग यांच्या पोटात शस्त्र खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आलं. मात्र तोपर्यंत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
advertisement

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला बेड्या

हल्ला केल्यानंतर आरोपी गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे परिसरात खळबळ उडाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे पोलिसांनी तातडीने तपासचक्रं फिरवली. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेत त्याला ताब्यात घेतले.
advertisement

लोकलमधील वादातून हत्या की वेगळं कारण?

अटक करण्यात आलेल्या आरोपीला सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, तिथे त्याची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीने हे कृत्य रागाच्या भरात केले की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईच्या लोकलमध्ये वाद, मालाड स्टेशनवर शिक्षकाची भोसकून हत्या, 12 तासात आरोपीला बेड्या
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement