Nanded Crime : अखेर कमलबाईच्या मृत्यूचं गुपित उलघडलं, तपासाची चक्र फिरली अन् मास्टरमाईंड समोर, अनैतिक संबंधांच्या नशेत सासूला संपवलं
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nanded Crime News : मुलाच्या मृत्यूनंतर सासू आणि सून यांच्यात घरगुती कारणावरून आणि चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होत असत, ज्याची परिणती अखेर या भीषण हत्याकांडात झाली.
Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या 54 वर्षीय कमलबाई क्षीरसागरे यांच्या खुनाचा धक्कादायक छडा पोलिसांनी लावला आहे. अत्यंत नियोजनबद्धरीत्या करण्यात आलेल्या या हत्येचा सूत्रधार चक्क त्यांची सूनच असल्याचे तपासात निष्पन्न झालंय. सुनेने आपल्या भावाच्या आणि प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केली असून, याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नवऱ्याचं लिव्हर खराब झाल्याने निधन
कमलबाई या हदगावमधील गौतमनगर परिसरात वास्तव्यास होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळाली होती. त्यांचा एकुलता एक मुलगा व्यसनाधीन होता आणि दोन महिन्यांपूर्वीच त्याचे लिव्हर खराब झाल्याने निधन झाले होते. मुलाच्या मृत्यूनंतर सासू आणि सून यांच्यात घरगुती कारणावरून आणि चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होत असत, ज्याची परिणती अखेर या भीषण हत्याकांडात झाली.
advertisement
कमलबाईंच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासले अन्....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी रोजी कमलबाई बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातवाने नोंदवली होती. मात्र, केवळ 2 तासांतच पोलिसांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह मिळून आला. संशय बळावल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि कमलबाईंच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासले. या तपासात सुनेच्या हालचाली संशयास्पद आढळल्या आणि गुन्ह्याचे सर्व धागेदोरे उघड झाले. सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनमध्ये सुनीताचा प्रियकर आणि भावाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.
advertisement
सून सुनीता आणि तिचा प्रियकर परमेश्वने काढला काटा
कमलबाई गाढ झोपेत असताना सून सुनीता आणि तिचा प्रियकर परमेश्वर वानखेडे यांनी स्कार्फने गळा आवळून त्यांचा खून केला. या क्रूर कृत्यात सुनेच्या भावाने देखील साथ दिली होती. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मात्र, पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत या हत्येमागील 'क्राइम थ्रिलर' समोर आणले आणि आरोपींना जेरबंद केले.
advertisement
हदगाव शहरात मोठी खळबळ
दरम्यान, या प्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका सरकारी महिला कर्मचाऱ्याचा तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी असा अंत केल्यामुळे हदगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आता या कटात अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 9:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Crime : अखेर कमलबाईच्या मृत्यूचं गुपित उलघडलं, तपासाची चक्र फिरली अन् मास्टरमाईंड समोर, अनैतिक संबंधांच्या नशेत सासूला संपवलं









