advertisement

Shocking Crime : भयानक कृत्य! संशयातून पत्नीची हत्या; मुलाला व्हिडिओ कॉलवर दाखवला थरारक प्रकार

Last Updated:

Mumbai Shocking News : मुंबईच्या धारावीतून समोर आलेल्या घटनेने सर्वचजण हादरुन गेलेले आहेत. जेथे नवऱ्याकडून असं काही घडलं आहे की त्यात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आहे.

त्नीचा जीव घेतल्यानंतर मुलाला व्हिडिओ कॉलवर दाखवला मृतदेह
त्नीचा जीव घेतल्यानंतर मुलाला व्हिडिओ कॉलवर दाखवला मृतदेह
मुंबई : मुंबईतील धारावी हा परिसरातून अंगाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. जिथं एका संशयामुळे माणूस किती टोकाचे पाऊल उचलू शकतो हे या घटनेतून समोर आले आहे.
धारावीतील कुटुंबात असं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण घटनाही धारावी कोळीवाडा येथे घडली आहे.जिथंच आरोपी अमृत आणि त्याची पत्नी सूरजबेन सोलंकी वास्तव्यास होती तर त्यांची चार मुले ती मुलुंड आणि ठाणे परिसरात राहतात.
या घटनेप्रकरणी आरोपीचा मुला शिवराम सोलंकीने दिलेल्या तक्रानुसार, गेल्या काही वर्षापासून आरोपी अमृत हे त्यांची पत्नी आणि मुलांवर करणी करण्याचा संशय घ्यायचे यावरुन या कुटुंबात वादही होत असायचे.
advertisement
व्हिडिओ कॉलवर समोर आला धक्कादायक प्रकार
13 मार्च म्हणजे घटनेच्या दिवशी आरोपी अमृतचा मुलगा हा त्यांना नातेवाइकांच्या अंत्यविधीसाठी बोलवण्यासाठी घरी गेला. पण नेमका तिकडे पोहचल्यावर घरचा दरवाजा बंद होता आणि आतूनही कोणता प्रतिसाद मिळत नव्हता.
त्यामुळे अमृतच्या मुलाने वडिलांना फोन केला पण मुलाचा फोन न उचलता त्यांनी उलट मुलाला व्हिडिओ कॉल केला,तेव्हा आरोपी अमृत रक्ताने माखलेला दिसून आला. घटना समोर आल्यानंर पत्नीची ओढणीने गळा आवळून आणि पाण्याची बाटली डोक्यात घालून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Crime : भयानक कृत्य! संशयातून पत्नीची हत्या; मुलाला व्हिडिओ कॉलवर दाखवला थरारक प्रकार
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement