प्रवाशांनो लक्ष द्या, पनवेलमध्ये मोठा ब्लॉक, या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या कामांमुळे अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असून प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सशी संबंधित विविध पायाभूत कामांसाठी 30 डिसेंबर 2025 पर्यंत विशेष रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकअंतर्गत अतिक्रमण हटविणे, रेल्वे पॉइंट्सचे पुनर्स्थापन, फलाटावर पादचारी पुलाचे गर्डर उभारणे तसेच स्टील तुळयांची उभारणी अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असून प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
हा विशेष ब्लॉक दररोज रात्री 1:30 ते 3:30 या वेळेत घेण्यात येणार आहे. यामध्ये पनवेल स्थानकात दिवा दिशेकडील पॉइंट क्रमांक 101 बी पुढे सरकविण्याचे कामही समाविष्ट आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे.
advertisement
ब्लॉकमुळे मंगळुरू–सीएसएमटी एक्स्प्रेस 30 डिसेंबरपर्यंत दररोज आपटा स्थानकावर 20 ते 30 मिनिटे थांबणार आहे. सीएसएमटी–करमाळी एक्स्प्रेस दररोज कळंबोली स्थानकावर 1 तास 15 मिनिटे थांबविण्यात येईल. तसेच करमाळी–सीएसएमटी एक्स्प्रेस दररोज जिते स्थानकात मडगाव दिशेने 1 तास 15 मिनिटे थांबेल.
लोकमान्य टिळक टर्मिनसशी संबंधित काही गाड्यांच्या वेळापत्रकात 28 डिसेंबरपर्यंत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, 25 डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस सोमाटणे स्थानकावर 1 तास 15 मिनिटे थांबेल. 30 डिसेंबर रोजी एर्नाकुलम–पुणे एक्स्प्रेसलाही अनुक्रमे 26 आणि 30 डिसेंबरला 1 तास 15 मिनिटांचा थांबा देण्यात येणार आहे.
advertisement
याशिवाय, दौंड–अजमेर अतिजलद एक्स्प्रेस 26 डिसेंबर रोजी मोहपे स्थानकावर 30 मिनिटे, तिरुवनंतपुरम–हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस 27 डिसेंबर रोजी सोमाटणे स्थानकावर 50 मिनिटे, तर सोलापूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 30 डिसेंबर रोजी मोहपे स्थानकावर 20 मिनिटे थांबेल.
दौंड–ग्वाल्हेर एक्स्प्रेस 28 डिसेंबर रोजी कर्जत–कल्याण–भिवंडी रोड मार्गे वळविण्यात येणार असून या गाडीचा पनवेल येथील थांबा रद्द करून कल्याण स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रकाची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 3:24 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवाशांनो लक्ष द्या, पनवेलमध्ये मोठा ब्लॉक, या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल








