Mumbai : वांद्रे टर्मिनस होणार आता हाय-टेक! आता लांब पल्ल्याच्या गाड्यांचा फेऱ्या वाढणार; नेमका प्लान काय?
Last Updated:
Coacing Line : वांद्रे टर्मिनसमध्ये तीन नव्या देखभाल मार्गिका सुरू झाल्याने पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्यांच्या गाड्यांची क्षमता वाढली आहे. यामुळे भविष्यात अधिक रेल्वेगाड्या चालवणे शक्य होणार आहे.
मुंंबई : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसमधील लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांच्या देखभाल क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गाड्यांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनसमध्ये तीन नव्या देखभाल मार्गिका उभारण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वेगाड्या उभ्या करण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली असून भविष्यात अधिक गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिक एक्सप्रेस गाड्या धावणार
याआधी वांद्रे टर्मिनसमध्ये केवळ तीन देखभाल मार्गिका होत्या. मात्र, आता नव्या तीन मार्गिकांची भर पडल्याने एकूण सहा मार्गिकांवर गाड्यांची देखभाल केली जाऊ शकते. या नव्या मार्गिकांवर रेल्वेगाड्या धुण्याची अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहे. प्रत्येक मार्गिकेची लांबी 540 मीटर असून त्या 24 डब्यांच्या प्रवासी गाड्यांसाठी उपयुक्त आहेत. एलएचबी, आयसीएफ तसेच अन्य सर्व प्रकारच्या डब्यांची देखभाल येथे केली जाणार आहे.
advertisement
सध्या वांद्रे टर्मिनसमधील कोचिंग डेपोत सुमारे 800 डब्यांची देखभाल केली जाते. एलएचबी डब्यांची देखभाल दर 36 महिन्यांनी तर आयसीएफ डब्यांची देखभाल दर 18 महिन्यांनी केली जाते.
रेल्वे टर्मिनसची क्षमता वाढवण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे नव्या मार्गिकांचे काम सुरू आहे तसेच वापरात असलेल्या फलाटांची लांबी वाढवण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. जोगेश्वरी आणि वसई रोड येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात आहे.
advertisement
या तीन नव्या मार्गिकांपैकी पहिली जुलै 2024 मध्ये वापरात आली होती, तर उर्वरित दोन मार्गिकांचे काम डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण झाले आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 56 कोटी 76 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या नव्या मार्गिकांमुळे भविष्यात अतिरिक्त नऊ लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची हाताळणी शक्य होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 12:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : वांद्रे टर्मिनस होणार आता हाय-टेक! आता लांब पल्ल्याच्या गाड्यांचा फेऱ्या वाढणार; नेमका प्लान काय?






