Girija Name Meaning : कित्येक दिवस चर्चेत आहे गिरीजा नाव; या नावाचा अर्थ काय माहितीये?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Girija Name Meaning : प्रत्येक नावामागे एखादी कथा, प्रतीकात्मक अर्थ किंवा धार्मिक संदर्भ असतो. गिरीजा हे असंच एक अर्थपूर्ण, सौम्य आणि संस्कृतीने समृद्ध नाव आहे. गिरीजा हे नाव फक्त एक सुंदर उच्चार असलेलं नाव नाही, तर त्यामागे खोल धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.
advertisement
गिरीजा हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. गिरी म्हणजे पर्वत आणि जा म्हणजे जन्मलेली. त्यामुळे गिरीजा याचा शब्दशः अर्थ होतो, पर्वतापासून जन्मलेली किंवा पर्वतराज हिमालयाची कन्या. हा अर्थ थेट देवी पार्वतीशी संबंधित आहे. देवी पार्वती हिमालयाची कन्या असल्यामुळे त्यांना गिरीजा असंही नाव दिलं गेलं आहे. हिंदू धर्मात गिरीजा हे नाव देवी पार्वतीचं एक पवित्र नाव मानलं जातं.
advertisement
advertisement
मराठी साहित्य, काव्य आणि भक्तिगीतांमध्येही देवी पार्वतीचं गिरीजा हे नाव आढळतं. त्यामुळे गिरीजा नावाला एक सांस्कृतिक खोली लाभलेली आहे. मराठी, हिंदी, संस्कृत तसंच इतर भारतीय भाषांमध्ये गिरीजा हे नाव आदराने घेतलं जातं. हे नाव पारंपरिक असलं तरी आजही आधुनिक काळात लोकप्रिय आहे. अनेक कुटुंबांमध्ये मुलीला हे नाव देताना सौम्यता, शालीनता आणि संस्कार यांचा विचार केला जातो.
advertisement











