advertisement

Aditya L1 Launch : काउंटडाउन सुरू, सूर्याच्या दिशेने झेपावणार आदित्य L1; कुठे, कधी पाहता येणार लाइव्ह?

Last Updated:

ditya L1 Solar Mission Launch updates : भारताची सूर्य मोहिम २ सप्टेंबर म्हणजेच आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होणार आहे. आदित्य एल१ ५ वर्षे सूर्याचा अभ्यास करणार आहे.

News18
News18
श्रीहरिकोटा, 02 सप्टेंबर : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 यशस्वीपणे उतरवलं. यानंतर इस्रोकडून पहिल्या सूर्य मोहिमेच्या लाँचिंगची तयारी करत आहे. आदित्य एल १ लाँचिंगसाठी तयार आहे. इस्रोने सांगितले की, PSLV c57 रॉकेटच्या माध्यमातून आदित्य एल1चे लाँचिंग केले जाणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथून हे लाँचिंग होणार आहे. सूर्याबद्दल माहिती मिळवण्याच्या उद्देशाने इस्रोने ही मोहिम आखली आहे.
भारताची सूर्य मोहिम 2 सप्टेंबर म्हणजेच आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सुरू होणार आहे. आदित्य एल1 हे 5 वर्षे सूर्याचा अभ्यास करणार आहे. यासाठी दीड मिलियन किमी प्रवास करेल. इस्रोसह इतर काही प्रतिष्ठित संस्थांच्या सहकार्याने ही मोहिम पार पडत आहेत. लाँचिंगसाठी रॉकेट आणि सॅटेलाइट तयार आहेत. याआधी सूर्य मोहिमेच्या लाँचिंगसाठी इस्रोने चाचणीही केली आहे.
advertisement
इस्रोकडून सूर्य मोहिम लाइव्ह पाहण्यासाठी लिंकही जारी केली आहे. इस्रोचे संकेतस्थळ https://isro.gov.in वर लाँचिंग लाइव्ह पाहता येणार आहे. याशिवाय इस्रोच्या फेसबुक पेज, युट्यूब चॅनलवरूनही याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. तसंच डीडी नॅशनल टीव्हीवर याचे लाइव्ह प्रक्षेपण 11.20 वाजल्यापासून केले जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Aditya L1 Launch : काउंटडाउन सुरू, सूर्याच्या दिशेने झेपावणार आदित्य L1; कुठे, कधी पाहता येणार लाइव्ह?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement