सहाव्या मजल्यावरून उडी घेत IAS अधिकाऱ्याच्या सचिवाने संपवलं जीवन,परिसरात खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
तैनात असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना काही कळण्याच्या अगोदर त्यांनी सहाव्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली.
हरियाणा : हरियाणा सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून एका वरिष्ठ सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. मृत व्यक्ती हे एका वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्याचे विशेष सचिव म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे सचिवालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गणेश दास अरोरा (वय 58) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते आयएएस अधिकारी हितेश कुमार मीणा यांचे विशेष सचिव म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी साधारण 12.24 च्या सुमारास घडली. गणेश अरोरा हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात काम करत होते, मात्र काम करताना ते अचानक खुर्चीवरून उठले आणि ते सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरील बाल्कनीत गेले होते. तेथे तैनात असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना काही कळण्याच्या अगोदर त्यांनी सहाव्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
बदली झाल्याने होते मानसिक तणावात
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश दास अरोरा हे गेल्या काही दिवसापासून तणावात होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाल्याने ते मानसिक तणावात होते. या मानसिक ताणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चर्चा वर्तुळात रंगली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ते निवृत्त होणार होते. अद्याप आत्महत्येचे कारण समोर आले नाही, मात्र पोलीस याचा सखोल तपास करत आहे.
advertisement
15 दिवसांपूर्वी देखील केला होता आत्महत्येचा प्रयत्न
15 दिवसांपूर्वी गणेश अरोरा यांनी सचिवालयाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. मात्र त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत बाजूला घेऊन गेले होते. परंतु बुधवारी कोणाचेही लक्ष नसताना त्यांनी उडी मारली. या घटनेने सचिवालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
advertisement
चंदीगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून 16 मधील सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे. गणेश अरोरा यांची पत्नी उमा अरोरा हरियाणा राजभवन (राज्यपालांचे घर) येथे तैनात आहे. कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. कामाच्या ठिकाणी ताण किंवा इतर दबावामुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेले का हे शोधण्यासाठी पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
advertisement
कोसळला आहे.
Location :
Delhi
First Published :
Feb 25, 2026 7:49 PM IST







