VIDEO : LIVE सामन्यात भयंकर ड्रामा, आधी कॅच ड्रॉप, नंतर पुढच्या चारच बॉलमध्ये हिशोब चुकता
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
न्यूझीलंडने डावाला चांगली सूरूवात केली होती. या दरम्यान मैदानात एक मोठा ड्रामा घडला आहे.हा ड्रामा पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही आहे.
Sri lanka vs New Zealand : कोलंबोच्या आर प्रेमादासा स्टेडिअमवर श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला सूरुवात झाली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने डावाला चांगली सूरूवात केली होती. या दरम्यान मैदानात एक मोठा ड्रामा घडला आहे.हा ड्रामा पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही आहे.
खरं तर न्यूझीलंडने डावाची चांगली सूरूवात करत 2 ओव्हरमध्ये 23 धावा काढल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेला विकेट काढणे आवश्यत होते.अशात श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकांच्या तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर खेळताना टीम सिफर्टच्या बॅटीला कड लागून महिश तिक्ष्णाच्या जवळ बॉल गेला होता. हा बॉल त्याच्या शरिरापासून दूर होता, त्यामुळे त्याला डाईव्ह मारावी लागली, त्याने चांगला प्रयास केला पण कॅच ड्रॉप झाली. यामुळे दिलशान मदुशंका त्याच्यावर प्रचंड वैतागला होता.
advertisement
Maheesh Theekshana’s lightning reflexes! ⚡
A sharp caught-and-bowled to dismiss the dangerous Finn Allen — pure presence of mind under pressure! 🏏🔥
pic.twitter.com/GV2UK05JNt
— Jitendra Kumar (@jitenda60203698) February 25, 2026
यानंतरची ओव्हर टाकायला स्वत:महिशा तिक्ष्णा आला होता. यावेळी त्याने ओव्हरच्या पहिल्याच बॉलला टीम सिफर्टला कॉट अँड बोल्ड केले होते.त्यामुळे अवघ्या 4 बॉलमध्ये त्याने कॅच ड्रॉपचा हिशोब चुकवला होता. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
advertisement
दरम्यान यानंतर दुशमंथा चमीराच्या ओव्हरमध्ये टीम सिफर्ट कामिंडू मेंडिसच्या हातात कॅच देऊन बाद झाला होता. अशाप्रकारे न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्ये 2 विकेट गमावून 44 धावा केल्या होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 7:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : LIVE सामन्यात भयंकर ड्रामा, आधी कॅच ड्रॉप, नंतर पुढच्या चारच बॉलमध्ये हिशोब चुकता







