कुंभ मेळ्यातील IIT बाबांना अखाड्यातून बाहेर काढले; अभय सिंह म्हणाले, माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे...
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
IITian Baba Abhay Singh Letest Controversy: महाकुंभ मेळ्यातील IITian बाबा अभय सिंह यांच्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. जूना अखाड्याने त्यांना अखाडा सोडण्याचे आदेश दिले आहेत.
प्रयागराज: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी काही लाख साधू-संत आणि भक्त आले आहेत. महाकुंभमध्ये सहभागी झालेल्यापैकी काहींना प्रचंड प्रसिद्धी देखील मिळते. कुंभची सुरुवात झाल्यानंतर विविध अखाड्यातील साधूंपासून ते नागा संन्यास्यांपर्यंत आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. या सर्वांमधून गेल्या १० दिवसात सोशल मीडियावर चर्चेत आलेले आयआयटीयन बाबा अभय सिंह याच्याबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
आयआयटीयन बाबा अभय सिंह यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे. कुंभ मेळ्यात ते ज्या जूना अखाड्यात होते तेथून त्यांना बाहेर केल्याचे समजते. विशेष म्हणजे गोष्टीला दुजोरा स्वतः आयआयटियन बाबा अभय सिंह यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, मला हटवले गेले, पण मी काही बोलू नये म्हणून थांबवले गेले.
advertisement
150 कोटींना खरेदी केला बंगला, स्टॅम्प ड्युटी म्हणून सरकारला मिळाले इतके कोटी
इतक नाही तर अभय यांनी असा आरोप केली की, माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सोमेश्वर पुरी अस्वस्थ झाले होते. त्यामुळे मला जूना अखाड्याचे छावणी सोडण्यास सांगितले गेले.
अभय सिंह यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांचा अखाडा सोडण्याच्या आणि थांबण्याच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर काही युझर्सनी त्यांची बाजू घेतली आहे तर काहींनी अखाड्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
advertisement
ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकरवर दुःखाचा डोंगर कोसळला; प्रिय व्यक्तींना गमावले
या वादावर जूना अखाड्याने असे म्हटले आहे की, गुरूविषयी अपशब्द वापरल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. संन्यासामध्ये शिस्त आणि गुरूप्रती समर्पण महत्त्वाचे असते आणि त्याचे पालन करणे आवश्यक असते.
ब्लॅक वॉरंट म्हणजे काय? कधी आणि कोणा विरुद्ध काढले जाते, त्यावर कोण सही करते?
आयआयटीयन बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले अभय सिंह हे जूना अखाड्याचे महंत सोमेश्वर पुरी यांचे शिष्य आहेत. त्यांनी मुंबई आयआयटीमधून एरोस्पेस इंजिनीअरिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर काही काळ नोकरी केली आणि नंतर ती सोडून आध्यात्मिक क्षेत्रात पाऊल ठेवले. सध्याच्या महाकुंभ मेळाव्यात त्यांना भेटण्यासाठी पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स येत होते. मात्र, या काळात त्यांचा गुरूंसोबत काही कारणावरून वाद झाला, ज्यामुळे हे प्रकरण समोर आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 19, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/देश/
कुंभ मेळ्यातील IIT बाबांना अखाड्यातून बाहेर काढले; अभय सिंह म्हणाले, माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे...