Shirur Election : शिरूरमध्ये महायुतीत उभी फूट, पण आघाडीची एकजूट! 24 जागांसाठी 202 उमेदवार, कोण मारणार बाजी?

Last Updated:

Shirur Municipal Council Election : शिरूर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी 9 अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदाच्या 24 जागांसाठी 202 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Shirur Municipal Council Election
Shirur Municipal Council Election
Shirur Local Body Election (सचिन तोडकर, प्रतिनिधी) : पुण्यातील शिरूर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली असून महायुतीतील तीनही पक्षानी या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय तर महाविकास आघाडी या ठिकाणी सध्यातरी एकत्र दिसत आहे. पक्षांनी उमेदवारी नाकारल्याने सर्वच पक्षांमधील नाराजांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने त्यांच्या माघारीसाठी सर्वच पक्षांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार आहे.

शिरूरच्या राजकारणाची नवी दिशा

गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ शिरूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिरूर नगरपरिषदेची सत्ता टिकवून ठेवणारे उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी यंदा शिरूर शहर विकास आघाडी निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे व निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यात लोकशाही क्रांती आघाडीचे रविंद्र धनक यांनीही निवडणूक न लढण्याची घोषणा केल्याने गेल्या तीस वर्षात शिरूरचे राजकारण प्रथमच स्थानिक आघाड्यांकडून दूर जाऊन पक्षीय लढतीकडे वळले आहे.
advertisement

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दासगुडे यांनी तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार अशोक पवार, भाजपकडून तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, जिल्हा संघटक धर्मेंद्र खंडारे आदींनी उपस्थित राहत आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.

24 जागांसाठी 202 उमेदवार

advertisement
शिरूर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी 9 अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदाच्या 24 जागांसाठी 202 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे.

नगराधपदासाठी कुणाचे अर्ज?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर भाजपकडून सुवर्णा राजेंद्र लोळगे यांना तिकीट देण्यात आलंय. तसेच शिवसेनेकडून रोहिणी किरण बनकर निवडणूक लढवतील. तर महाविकास आघाडीकडून अलका सुरेश खंडारे यांनी नगराधपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Shirur Election : शिरूरमध्ये महायुतीत उभी फूट, पण आघाडीची एकजूट! 24 जागांसाठी 202 उमेदवार, कोण मारणार बाजी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement