तेव्हा 167 जणांचा मृत्यू आणि आज 18 जण दगावले; काय आहे नेपाळच्या विमानतळावरचं रहस्य?

Last Updated:

काठमांडूहून पोखराला जाणाऱ्या शौर्य एअरलाइन्सच्या विमानाचा आज अपघात झाला आहे. या अपघातात 18 प्रवासी दगावले आहेत. नेपाळचा निसर्गसौंदर्याने नटलेला एअरपोर्ट आणि तिथले अपघात हा एक विचित्र योगायोग आहे. त्याचं भौगोलिक स्थान हे या अपघातांमागचं प्रमुख कारण आहे.

News18
News18
काठमांडू:
विमानाचं टेकऑफ आणि लॅंडिंग ही वैमानिकाच्या कौशल्याची परीक्षा असते. कोणत्या विमानतळावरची धावपट्टी कशी असते याचा अंदाज घेऊन अत्यंत काळजीपूर्वक वैमानिकाला या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. नेपाळमधल्या त्रिभुवन एअरपोर्टची धावपट्टी ही वैमानिकांची परीक्षा पाहणारी धावपट्टी आहे. तिथे झालेले काही अपघात अनेकांच्या स्मरणात आहेत.
नेमके का होतात अपघात?
काठमांडूहून पोखराला जाणाऱ्या शौर्य एअरलाइन्सच्या विमानाचा आज अपघात झाला आहे. या अपघातात 18 प्रवासी दगावले आहेत. नेपाळचा निसर्गसौंदर्याने नटलेला एअरपोर्ट आणि तिथले अपघात हा एक विचित्र योगायोग आहे. त्याचं भौगोलिक स्थान हे या अपघातांमागचं प्रमुख कारण आहे. नेपाळच्या त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवर फक्त एकच रनवे आहे. त्यामुळे विमानांचं टेकऑफ आणि लॅंडिंग करणं खूप जिकिरीचं असतं. इथे नुकत्याच झालेल्या अपघातात 18 प्रवशांचा मृत्यू झाला आहे. या एअरपोर्टवर 1992मध्ये सगळ्यात गंभीर विमान अपघात झाला. त्यात 167 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं एक विमान काठमांडूत लॅंड करत असताना हा अपघात झाला होता. असे अनेक अपघात या एअरपोर्टवर झाले आहेत.
advertisement
हिमालय पर्वतराजीमध्ये नेपाळचा त्रिभुवन एअरपोर्ट वसलेला आहे. त्याची धावपट्टी नॅव्हिगेट करणं हे सर्वांत कौशल्याचं मानलं जातं. त्याच्या भौगोलिक स्थानामुळे तिथे नेहमीच अपघातांचा धोका असतो. हिमालयाकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे इथली हवा कधीही बदलते. त्याचा परिणाम विमान वाहतुकीवर होतो. या एअरपोर्टवर एकच रनवे आहे. त्याची लांबी इतर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट्सच्या तुलनेत कमी आहे. रनवे जास्त उंचीवर आहे. त्यामुळे विमानांचं टेकऑफ आणि लॅंडिंगला वेळ लागतो. फक्त अनुभवी आणि निष्णात पायलट्सच इथे टेकऑफ आणि लॅंडिंग करू शकतात.
advertisement
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं विमान कोसळलं ती या एअरपोर्टवरची सर्वांत मोठी दुर्घटना आहे. 2015मध्ये तुर्की एअरलाइन्सच्या एका विमानाचं इथे क्रॅश लॅंडिंग झालं; मात्र त्यात जीवितहानी झाली नाही. 2018मध्ये झालेल्या एका अपघातात 49 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी झालेल्या आणखी एका विमान अपघातात 51 प्रवासी दगावले होते. पायलट भावनिकदृष्ट्या दुखावलेला असल्यामुळे हा अपघात झाला असं म्हटलं जातं. 2023मध्ये यती एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला. त्यात 72 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
तेव्हा 167 जणांचा मृत्यू आणि आज 18 जण दगावले; काय आहे नेपाळच्या विमानतळावरचं रहस्य?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement