Farmer Success Story: शेतात केला डाळींबाचा प्रयोग, शेतकऱ्याला मिळालं 8 लाख उत्पन्न, सांगितला यशाचा मंत्र

Last Updated:
नेहमी नेहमी होणारे नुकसान, अवकाळी पाऊस, पडलेले बाजार भाव यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत असतो. परंतु काही शेतकरी शेतामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करतात आणि आपलं उत्पन्न वाढवून घरी समृद्धी आणतात.
1/7
शेती शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीसं नकारात्मक चित्र उभं राहतं. नेहमी नेहमी होणारे नुकसान, अवकाळी पाऊस, पडलेले बाजार भाव यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत असतो.

advertisement
2/7
परंतु काही शेतकरी शेतामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करतात आणि आपलं उत्पन्न वाढवून घरी समृद्धी आणतात. महिना 1 लाख पॅकेज असलेली पगार तर तुम्ही अनेक पाहिले असतील. परंतु महिना 1 लाख रुपये उत्पन्न शेतीमधून मिळवणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

3/7
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कवडगाव येथील दीपक खाडे असं या शेतकऱ्याचं नाव. दीपक खाडे हे अशिक्षित आहेत. याआधी ते पिकअप चालवायचे. ड्रायव्हर लाईनमध्ये असल्याने अनेक व्यसनं त्यांना होती. जीवनात काहीही उरलं नाही अशा नैराश्याने घेरलं होत होतं.

4/7
परंतु शेवट हीच खरी सुरुवात समजून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीमध्ये चार लाखांची विहीर घेतली. शरद की नावाच्या वाणाची डाळिंब बाग दीड एकरात लावली.

5/7
डाळिंब बागेतलं फारसं काही माहीत नसल्याने व्यावसायिक तांत्रिक माहिती देणारा व्यावसायिक लावला. बाग उत्तमरीत्या फुलवली. साडेतीन एकरामध्ये मोसंबी बागेची लागवड केली. या दोन्ही बागेची योग्य जोपासना केल्याने दोन्ही बागांमधून चांगलं उत्पन्न मिळायला लागले.

6/7
यंदा त्यांच्या डाळिंबांना 120 रुपये प्रति किलो असा विक्रमी भाव मिळाला. पण आठ टन डाळिंबाचे उत्पन्न झाल्यावर यामधून त्यांना 8 लाखांचं उत्पन्न हातामध्ये आलं. तर साडेतीन एकर मोसंबी बागेमधून त्यांना 3 ते 4 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. एकूण 11 ते 12 लाखांचं उत्पन्न त्यांना यंदा शेतीमधून मिळणार आहे.

7/7
आता त्यांचं मतपरिवर्तन झालं असून तरुणांनी व्यसनाधीनतेकडे वळण्यापेक्षा शेतीचं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे व्यसन करावं, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करावे आणि महिना 1 लाख रुपये उत्पन्न कमवावं, असं आवाहन ते तरुण शेतकऱ्यांना करतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement