Gajendra Reda: 'बाहुबली' रेडा! रोज पितो 15 लिटर दूध, 3 किलो खातो सफरचंद, बंगला येईल एवढी किंमती PHOTOS
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Gajendra Reda: मुरा जातीचा गजेंद्रला चार दिवसांचा असताना 1 लाखाची मागणी होती. तर हरियाणातील प्रसिद्ध उत्पादकांनी तब्बल दीड कोटी रुपयांना मागितला होता.
सांगली: रुबादार, अवाढव्य आणि नजरेत भरेल असा हा रेडा पहा. या रेड्याची किंमत आहे तब्बल दीड कोटी. सध्या सांगलीच्या पलूसमधील 'यशवंत' कृषी प्रदर्शनचं हा मुख्य आकर्षण ठरतो आहे. दीड टन वजनाच्या आणि दीड कोटी किमतीच्या हिंद केसरी गजेंद्र रेड्याविषयी अधिक लोकल18च्या प्रतिनिधींनी रेडा मालक ज्ञानेश्वर विलास नाईक यांच्याकडून अधिक जाणून घेतले.
advertisement
रेड्यामुळेच मिळाली देशभर प्रसिद्धी : मुरा जातीचा असणाऱ्या गजेंद्र रेड्याला चार दिवसांचा असताना 1 लाखाची मागणी होती. तसेच हरियाणातील प्रसिद्ध उत्पादकांनी काही वर्षांपूर्वी तब्बल दीड कोटीला मागितला होता. मात्र, "गजेंद्रला आम्ही विकणार नाही. त्यानं आमचं नशिब चमकवलय. त्याच्यामुळेच आम्हाला धन-दौलत अन् देशभर मान मिळतोय," असे रेडा मालक कृतज्ञतेने सांगतात.
advertisement
मुरा प्रजात पैदाशीसाठी वापर : विलास नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार; काही वर्षांपूर्वी विलास नाईक यांचे वडील गणपती नाईक यांनी हरियाणावरून दीड लाखांची हरियाणा मुरा म्हैस विकत आणली होती. त्या म्हैशीपासून त्यांना हा गजेंद्र रेडा मिळाला. अत्यंत जातीवंत मुरा वंशातील असल्याने चार दिवसांचा असतानाच या रेड्याला एक लाखाची मागणी झाली होती. परंतु हौशी पशुपालक गणपती नाईक यांनी रेडा सांभाळायचे ठरवले. त्यांच्या या निर्णयाने त्यांचे नशीब पालटले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement











