घरच्या गार्डनमध्ये द्राक्षं कशी पिकवायची? A TO Z माहिती

Last Updated:
Agriculture News : द्राक्षांचे नाव घेताच लोकांच्या मनात नाशिक जिल्ह्याचे चित्र उभे राहते. कारण महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नाशिकची ओळख आहे.
1/5
Agriculture News
द्राक्षांचे नाव घेताच लोकांच्या मनात नाशिक जिल्ह्याचे चित्र उभे राहते. कारण महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, द्राक्षांची लागवड केवळ नाशिकपुरती मर्यादित आहे, हा गैरसमज आता दूर व्हायला हवा. आधुनिक शेतीत अनेक सुधारित आणि हवामानास अनुरूप अशा द्राक्षांच्या जाती उपलब्ध झाल्या आहेत, ज्या भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात यशस्वीपणे पिकवता येतात. विशेष म्हणजे, द्राक्षांची लागवड करण्यासाठी मोठे शेतच आवश्यक असते असे नाही. इच्छाशक्ती आणि योग्य पद्धत असेल, तर घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा अगदी कुंडीतही द्राक्षांचे वेल सहज वाढवता येतात. ते कसं? पाहूया
advertisement
2/5
agriculture
आजच्या शहरी जीवनशैलीत ‘किचन गार्डन’ आणि घरगुती शेतीकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत. कुंडीतून द्राक्षे पिकवणे हा त्याचाच एक भाग आहे. यासाठी फार मोठी गुंतवणूक लागत नाही. थोडी काळजी, नियमित वेळ आणि योग्य माहिती असेल, तर घरच्या घरी ताजी, रसायनमुक्त द्राक्षे मिळू शकतात. द्राक्षे केवळ चवीला उत्तमच नाहीत, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय उपयोगी आहेत. त्यामुळे अनेकांना स्वतःच्या घरी द्राक्षांची लागवड करण्याची इच्छा असते.
advertisement
3/5
agriculture
सामान्यतः द्राक्षांची शेती कलमांपासून केली जाते, कारण त्यातून उत्पादन लवकर मिळते. मात्र, आता बियाण्यांपासूनही द्राक्षे पिकवता येतात. या पद्धतीला थोडा जास्त कालावधी लागतो, पण योग्य निगा राखली, तर चांगला वेल तयार होतो. बियाणे निवडताना दर्जेदार आणि रोगमुक्त बियाणेच वापरणे महत्त्वाचे आहे. स्थानिक नर्सरी किंवा विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच साहित्य खरेदी करावे.
advertisement
4/5
agriculture
कुंडीत द्राक्षांची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम मोठे, खोल आणि मजबूत कुंडी वापरणे गरजेचे आहे. कुंडीच्या तळाला पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्रे असावीत. पाणी साचून राहिल्यास मुळे सडण्याची शक्यता असते. कुंडीत भरलेली माती भुसभुशीत असावी. त्यामध्ये शेणखत, गांडूळ खत किंवा सेंद्रिय कंपोस्ट मिसळल्यास झाडाची वाढ चांगली होते. बियाणे लावण्यापूर्वी त्यांना काही तास पाण्यात भिजवून ठेवणे फायदेशीर ठरते. नंतर बियाणे सुमारे एक ते दोन इंच खोल मातीमध्ये पेरून हलक्या हाताने मातीने झाकावे आणि पाणी द्यावे.
advertisement
5/5
agriculture
द्राक्षाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कुंड अशा ठिकाणी ठेवावे जिथे वेलाला दररोज किमान सहा ते सात तास थेट सूर्यप्रकाश मिळेल. सुरुवातीच्या काळात नियमित पाणी देणे आवश्यक आहे, मात्र पाणी अति होणार नाही याची काळजी घ्यावी. काही दिवसांनंतर सेंद्रिय खताचा हलका डोस दिल्यास झाड जोमाने वाढते. योग्य काळजी घेतल्यास साधारण दोन ते अडीच महिन्यांत वेल वाढून फुलोरा येऊ लागतो आणि पुढे फळधारणा सुरू होते.
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement