सीताफळ शेतीचा जालना पॅटर्न, एकरात मिळवलं 1 लाख 28 हजार उत्पन्न
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जालना जिल्ह्यातील वखारी गावचे रामप्रसाद खैरे यांनी आपल्या 20 एकर क्षेत्रावर सिताफळांची लागवड करून शाश्वत उत्पन्नाचे साधन शोधले. पाहुयात कसा केला त्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देऊन सीताफळ शेतीचा प्रयोग.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सुरुवातीला 2017 मध्ये बालानगर या वाणापासून त्यांनी दोन एकर शिताफळ लागवडीला सुरुवात केली. हळूहळू हे क्षेत्र वाढवत नेत आता तब्बल एकूण 20 एकर क्षेत्रावर वेगवेगळ्या वाणांच्या सीताफळाची लागवड त्यांनी केली आहे. 2022 पासून त्यांना संपूर्ण 20 एकर सीताफळ बागेतून उत्पन्नाला सुरुवात झाली. 2020 मध्ये 7 लाख 21 हजार रुपयांचा बगीचा त्यांनी व्यापाऱ्याला ठोक दिला.
advertisement
तर 2023 मध्ये याच बागेमधून 15 लाख 21 हजार उत्पन्न मिळालं. 2024 मध्ये 23 लाख 51 हजार रुपयांना त्यांनी बगीच्या व्यापाऱ्याला ठोक दिला आहे. प्रती एकर 1 लाख 38 हजार रुपये त्यांच्या सिताफळ बागेतून त्यांना उत्पादन होत आहे तर 10 हजार रुपये प्रति एकर खर्च वगळता 1 लाख 28 हजारांचा निव्वळ नफा सिताफळ शेतीमधून रामप्रसाद खैरे कमवत आहेत. केवळ रविवारीच वेळ देऊन त्यांनी हे यश मिळवलं असल्याने ते या शेतीला संडे फार्मिंग संबोधतात.
advertisement
'माझ्याकडे एकूण चार व्हरायटी आहेत. बालानगर, सरस्वती सेवन, सरस्वती वन आणि गोल्डन अशा प्रकारे चार व्हरायटी माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे पीक एक प्रकारे शेतकऱ्यांना वरदान आहे. याला खर्च कमी आहे जास्त मेहनतीची गरज नाही कमी मजूर लागतात आणि विशेष म्हणजे पाण्याचीही आवश्यकता अत्यल्प असते. सहा महिन्याचे पीक असं मी या पिकाला म्हणतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देऊन सिताफळ शेतीकडे वळावे आणि आपली आर्थिक भरभराट करावी', असे आवाहन रामप्रसाद खैरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.









