कांद्याच्या पिकात ज्वारीचे आंतरपीक, खर्च 5 हजार अन् कमाई 1 लाख, कसं झालं शक्य?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
शेतकरी नागेश ननवरे यांनी कांद्याच्या पिकात हुरड्याचं (ज्वारी) आंतरपीक घेतलं आहे. लागवडीसाठी 5 हजार रुपये पर्यंत खर्च आला असून या हुरडाच्या विक्रीतून शेतकरी ननवरे यांना आतापर्यंत एक लाखाचे उत्पन्न मिळालं आहे.
advertisement
advertisement
कृषिभूषण शेतकरी नागेश अर्जुन ननवरे हे बीबीदारफळ येथे पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक शेती करत आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून ते हुरड्याची विक्री करत आहेत. कांद्याची लागवड केल्यानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर अडीच फुटावर चार बियाणे या पद्धतीने 35 गुंठ्यात हुरड्याची लागवड केली. ननवरे यांनी ऑक्टोबर महिन्यात टोकन पद्धतीने हुरडा लागवड केली. फुले मधुरा, कुची कुची, गूळभेंडी आणि सुरती या चार प्रकारच्या हुरड्याची लागवड त्यांनी केली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आणखी हुरडा विक्री सुरू असून राहिलेल्या हुरड्यातून देखील 30 ते 40 हजार रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकरी नागेश ननवरे यांनी व्यक्त केलीये. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपेक्षा पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक शेती केल्यास आणि आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास शेती नक्की परवडेल, असे कृषिभूषण ननवरे सांगतात.