June Astrology: आता भाग्य उजळणार! जून महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन या 4 राशींना पैसा देणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
June Horoscope Marathi: ज्योतिषशास्त्रात नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रं महत्त्वाची मानली जातात. प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशिपरिवर्तन करत असतो. जून महिना सुरू झाला आहे. या महिन्यात पाच महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. ग्रहांच्या राशिपरिवर्तनामुळे सर्व राशींना प्रतिकूल किंवा अनुकूल फळ मिळेल; मात्र पाच राशींसाठी ग्रहांचं राशिपरिवर्तन लाभदायक ठरेल. याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
वृषभ : चार मोठ्या ग्रहांचं राशिपरिवर्तन या राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक असेल. या कालावधीत शुक्र ग्रहामुळे जीवनात सुखसुविधा येतील. सूर्याच्या गोचर भ्रमणामुळे करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकाल. बुधामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. व्यवसायात वाढ होईल. जून महिन्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या कालावधीत आर्थिक संकट दूर होईल. नशीब उजळेल. पैशांच्या बाबतीत हा महिना चांगला असेल.
advertisement
मेष : जून महिन्यात बुध, शुक्र, मंगळ आणि सूर्य राशिपरिवर्तन करत आहेत. मेष राशीच्या ज्या व्यक्ती नवीन कामाच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळेल. तसंच या व्यक्ती त्यांच्या कामाचा विस्तार करू शकतील. जून महिना तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. या कालावधीत नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना नवीन नोकरी मिळू शकते. तसंच या कालावधीत तुम्हाला एखादी चांगली बातमी समजेल.
advertisement
advertisement
कन्या : या कालावधीत कन्या राशीच्या व्यक्तींना चांगली फळं मिळतील. ज्या व्यक्ती दीर्घ काळापासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगली संधी मिळू शकते. या कालावधीत वेतन वाढू शकतं. त्यामुळे साहजिकच बचत करू शकाल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर त्यात नफा मिळेल. प्रॉपर्टी खरेदीचा विचार असेल तर हीदेखील इच्छा पूर्ण होऊ शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)






