Bajaj आता मार्केट करणार जाम, आणली स्वस्तात मस्त अशी स्कुटर, किंमत आणि रेंजही जबरदस्त
- Published by:Sachin S
Last Updated:
बजाजने आपली लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचं स्वस्तात मस्त असं मॉडेल लाँच केलं आहे. नवीन चेतक C25 अखेरीस मार्केटमध्ये दाखल झाली आहे.
भारतातील सर्वात मोठी बाइक आणि रिक्षा उत्पादक कंपनी असलेल्या बजाज ऑटोने आता मार्केटमध्ये नवीन धमाका केला आहे. बजाजने आपली लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचं स्वस्तात मस्त असं मॉडेल लाँच केलं आहे. नवीन चेतक C25 अखेरीस मार्केटमध्ये दाखल झाली आहे. चेतक सीरिजमध्ये ही सगळ्यात स्वस्त अशी स्कुटर आहे. या स्कुटरची किंमत एक्स-शोरूम 91,399 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Bajaj Chetak C25 मध्ये आता 2.5kWh बॅटरी, हब-माउंटेड मोटर C2501 मध्ये 2.5kWh ची बॅटरी पॅक आहे, जी फ्लोरबोर्डखाली बसवली आहे आणि कंपनीनुसार ही 113 किमी रेंज देते. पहिल्यांदाच चेतकमध्ये बजाजने हब-माउंटेड मोटर वापरली आहे, जी 1.8kW सतत आणि 2.2kW पीक पॉवर देते. याचा टॉप स्पीड 55 किमी प्रतितास इतका आहे
advertisement
advertisement
advertisement
Bajaj Chetak C25 मध्ये कलर एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे कॉल अलर्ट, एसएमएस नोटिफिकेशन आणि म्युझिक कंट्रोलची सुविधा आहे. यात हिल-होल्ड असिस्टही आहे, त्यामुळे स्कूटर 19% च्या चढावरही दोन लोकांसह सहज चढ पार शकते. याशिवाय Bajaj Chetak C25 मध्ये २ रायडिंग मोड (इको आणि स्पोर्ट), रिव्हर्स असिस्ट फंक्शन, यूएसबी चार्जिंग पोर्ट, फ्रंट एप्रन कॅबी आणि 25 लिटरचे मोठे अंडरसीट स्टोरेजही दिले आहे.
advertisement
Bajaj Chetak C25 ची किंमत 91,399 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. चेतक C25 ही आता इतक ईलेक्ट्रिक बाइकच्या स्पर्धेत स्वस्तात मस्त अशी स्कुटर आहे. Bajaj Chetak C25 च्या लॉन्चिंगनंतर बजाजने आता शहरी भागातील ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. ola, TVS, Honda च्या ईलेक्ट्रिक स्कुटरला टक्कर देण्यासाठी Bajaj Chetak C25 आता मार्केटमध्ये आली आहे.








