'या'आहेत देशातील सर्वात स्वस्त Sunroof कार! किंमत 7,36,490 रुपयांपासून सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Most Affordable Sunroof Cars in India: देशातील सर्वात स्वस्त कारच्या लिस्टमध्ये आपण Hyundai Exter, Tata Punch, Kia Sonet, Hyundai Venue आणि Tata Altroz चा समावेश केलाय. याची किंमत 10 लाख रुपयांहून कमी आहे आणि फीचर्सही शानदार आहेत.
Most Affordable Sunroof Cars in India: सध्याच्या काळात नवीन गाडी खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार करतात. प्रत्येकाला भारी फीचर्स हवे असतात. गाडी खरेदीपूर्वी त्यातील फीचर लिस्ट चेक केली जाते. सध्या सनरुफ सर्वात जास्त चलनात आहे. देशातील कार कंपन्यांनीही याची खास काळजी घेत स्वस्त गाड्यांमध्येही सनरुफ ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी आपण देशातील 5 सर्वात स्वस्त सनरुफ असलेल्या कारविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
या लिस्टमध्ये Hyundai Exter, Tata Punch, Kia Sonet, Hyundai Venue आणि Tata Altroz च्या नावाचा समावेश आहे. या सर्व सब-कॉम्पॅक्ट SUV किंवा हॅचबॅक सेगमेंटमध्ये प्रसिद्ध आहे आणि यामध्ये सनरुफही उपलब्ध आहे. या कारची किंमत 10 लाख रुपयांहून कमी आहे. चला या कारविषयी आणि त्यांच्या खासियतविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
Tata Altroz : ही प्रीमियम हॅचबॅक आहे. जी 5-स्टार सेफ्टी रेटिंगसाठी ओळखली जाते. सनरुफ (व्हॉइस असिस्टेंड इलेक्ट्रिक सनरुफ) Pure S किंवा XM S व्हेरिएंटने सुरु होते. ज्याची किंमत 7,36,490 रुपयांनी सुरु होते. ही सर्वात स्वस्त सनरुफच्या कारमधून एक आहे. Altroz मध्ये 1.2L पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी ऑप्शन आहे. मायलेज 18-23 kmpl पर्यंत मिळतं. फीचर्समध्ये 10.25 इंच इंफोटेनमेंट, वायरलेस चार्जिंग , क्रूझ कंट्रोल आणि चांगली बिल्ड क्वालिटीचा समावेश आहे.
advertisement
Hyundai Exter : मायक्रो SUV सेगमेंटमध्ये ही खुप प्रसिद्ध आहे. सनरुफ (स्मार्ट इलेक्ट्रिक, व्हॉइंस कंट्रोल) S+ किंवा S(O)+ व्हेरिएंटशी मिळतो. किंमत 7.86 लाख रुपयांपासून 8.99 लाखपर्यंत जाते. तर Exter चा बेस प्राइज 5.64 रुपयांनी सुरु होऊन 5.74 लाख रुपयांपर्यंत जातो. मात्र सनरुफ व्हेरिएंट 8 लाख रुपयांच्या आसपास आहे. यामध्ये 1.2L पेट्रोल/CNG इंजिन, 19-27 kmpl मायलेज (CNG मध्ये बेस्ट), 6 एअरबॅग, वायरलेस चार्जिंगसारखे फीचर्स आहेत.
advertisement
Tata Punch :टाटा पंच ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी मायक्रो एसयूव्ही आहे. सनरूफ (व्हॉइस-असिस्टेड इलेक्ट्रिक) अकम्प्लिश्ड किंवा क्रिएटिव्ह व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. किंमत ₹8.29 लाख पासून सुरू होते, ज्याची मूळ किंमत ₹5.60 लाख आहे. 5-स्टार ग्लोबल NCAP सेफ्टी, 1.2L पेट्रोल/सीएनजी इंधन कार्यक्षमता, 18-20 kmpl आणि 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल सारख्या फीचर्समुळे ती एक उत्तम पर्याय बनते.
advertisement
Kia Sonet : ही सब-कॉम्पॅक्ट SUV प्रीमियम फील देते. सनरूफने सुसज्ज असलेल्या HTK+ किंवा HTK+(O) प्रकारांपासून किंमत सुरू होते आणि ₹9.10 लाख ते ₹9.95 लाखांपर्यंत असते. मूळ किंमत ₹7.30 लाख आहे. 1.2L NA पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि डिझेल ऑप्शन, ADAS, व्हेंटिलेटेड सीट्स आणि बोस ऑडिओ सारख्या उच्च दर्जाच्या फीचर्समुळे ती खास बनते.
advertisement
Hyundai Venue : अपडेटेड मॉडलमध्ये सनरुफ HX5 किंवा S(O)+ पासून सुरु होते. याची किंमत ₹9.35 लाख ते ₹9.99 लाख रुपयांपर्यंत जाते. 1.2L/1.0L टर्बो पेट्रोल, डिझेल, चांगला मायलेज आहे. ब्लूलिंक कनेक्टेड कार, वायरलेस चार्जिंग आणि चांगला इंटीरियर याला परफेस्ट बनवते. खरंतर याचा सनरुफ व्हेरिएंट इतरांच्या तुलनेत महाग आहे.
advertisement
कृपया लक्षात ठेवा की, या किमती एक्स-शोरूम आहेत; ऑन-रोड किमती 10-15% जास्त असू शकतात. लेटेस्ट ऑफर्ससाठी नेहमी तुमच्या डीलरशी संपर्क साधा, कारण जाहिराती आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. कार खरेदी करताना, तिची फीचर्स आणि परफॉर्मेंस समजून घेण्यासाठी टेस्ट ड्राइव्ह नक्की घ्या. यापैकी कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी, तुमचे बजेट आणि गरजा विचारात घ्या.








